गजानन महाराजांचे जीवन निरपेक्ष भक्तीचे आणि मानवसेवेचे उदाहरण – आ. किशोर जोरगेवार

0
20

==============================

गजानन महाराज प्रकट दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन 

                    चंद्रपूर               ======================                  हॅलो चांदा न्युज 

चंद्रपूर,(का प्र ),गजानन महाराज प्रकट दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

गजानन महाराज हे भक्तीसेवा आणि त्यागाचे प्रतीक होते. त्यांचे विचार आणि शिकवणी आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात.  त्यांचे कार्य हे केवळ अध्यात्मापुरते मर्यादित नव्हते, गजानन महाराज यांच्या प्रकट दिना निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहरातील गजानन मंदिरांमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांनी गजानन महाराजांचे दर्शन घेतले तसेच घुग्घूस येथे काडण्यात आलेल्या रथयात्रेतही आमदार किशोर जोरगेवार यांनी सहभाग दर्शविला.स्वावलंबी नगर येथे आयोजित कार्यक्रमात बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले किगजानन महाराजांनी मानवतेची शिकवण दिली. त्यांच्या जीवनाचा सारांश सेवा हाच खरा धर्म हा होता. आपणही त्यांच्या या शिकवणीचा अंगीकार करून समाजसेवेत योगदान द्यावे. आजच्या धकाधकीच्या जीवनातही आपण त्यांची शिकवण आचरणात आणलीतर आपले आयुष्य अधिक समाधानकारक होईल. तसेच ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे.     तर त्यांनी समाजात एकात्मतेचा संदेश दिला. त्यांचा गण गण गणात बोते हा मंत्र प्रत्येक भक्ताच्या ओठावर असतो. हा मंत्र आपल्याला कठीण प्रसंगांवर मात करण्याची प्रेरणा देतो आणि आपल्या जीवनाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. गजानन महाराजांचे जीवन हे निरपेक्ष भक्तीचे आणि मानवसेवेचे उदाहरण असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले, 

धार्मिक व सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि त्यातून समाजात सद्भावना निर्माण करणे हे खरे भक्तीचे लक्षण आहे. हा दिवस आपल्यासाठी केवळ एक उत्सव नाहीतर श्रद्धा आणि भक्तीचा संकल्प आहे. गजानन महाराजांनी संपूर्ण मानवजातीला प्रेमसेवा आणि त्यागाचे मार्गदर्शन दिले. त्यांच्या शिकवणींमधून आपल्याला संयमश्रद्धा आणि मानवसेवेचे महत्त्व कळत असल्याचे ते यावेळी म्हणाले. गजानन महाराज प्रकट दिना निमित्त विविध ठिकाणी धार्मीक कार्यक्रमांचे आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

 =====================        *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ======================= 

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*
*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

धार्मिक व सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि त्यातून समाजात सद्भावना निर्माण करणे हे खरे भक्तीचे लक्षण आहे. हा दिवस आपल्यासाठी केवळ एक उत्सव नाहीतर श्रद्धा आणि भक्तीचा संकल्प आहे. गजानन महाराजांनी संपूर्ण मानवजातीला प्रेमसेवा आणि त्यागाचे मार्गदर्शन दिले. त्यांच्या शिकवणींमधून आपल्याला संयमश्रद्धा आणि मानवसेवेचे महत्त्व कळत असल्याचे ते यावेळी म्हणाले. गजानन महाराज प्रकट दिना निमित्त विविध ठिकाणी धार्मीक कार्यक्रमांचे आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here