Home
Home चंद्रपूर युवकांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी दर्जेदार क्रीडा संकुल आवश्यक – आ....

युवकांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी यासाठी दर्जेदार क्रीडा संकुल आवश्यक – आ. किशोर जोरगेवार

0
79

============================

चंद्रपूरच्या क्रीडा संकुलांच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांची क्रीडा मंत्री यांच्यासह बैठक

                         चंद्रपूर     

                   हॅलो चांदा न्यूज 

चंद्रपूर.(का प्र):- विधानसभा क्षेत्रातील क्रीडा संकुलांच्या अडचणी दूर करून युवकांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांची मुंबई मंत्रालयात भेट घेतली. या बैठकीत त्यांनी चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल, घुग्घुस तालुका क्रीडा संकुल आणि वीर बाबुराव शेडमाके अत्याधुनिक क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी आवश्यक सुधारणा व निधी मंजुरीची मागणी केली आहे .

चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल हे मैदानी व इनडोअर खेळांसाठी उपयुक्त असूनही सध्या येथे अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. स्वच्छतागृह, विद्युत रोषणाई, जलतरण पूल आणि खेळासाठी आवश्यक सामग्रीच्या कमतरतेमुळे खेळाडूंना अडचणींचा सामना करावा लागत आहे. खेळाडूंच्या या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची गरज असल्याचे सदर बैठकीत आमदार जोरगेवार यांनी क्रीडा मंत्री यांना सांगितले.

घुग्घुस येथे प्रस्तावित तालुका क्रीडा संकुलासाठी जागा अधिग्रहण आणि निधी वितरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे या संकुलाच्या उभारणीसाठी लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी बैठकीत म्हटले आहे. तसेच, मौजा दाताळा येथे प्रस्तावित वीर बाबुराव शेडमाके अत्याधुनिक क्रीडा संकुलासाठी 16 एकर जागा आरक्षित करण्यात आली असून, या प्रकल्पासाठी लागणार्या निधीच्या मंजुरीसाठीही त्यांनी आग्रह धरला.

चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना उत्तम क्रीडा सुविधा मिळाव्यात आणि त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी योग्य तयारी करता यावी, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी यावेळी बैठकीत केली आहे .              ========================     *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*      ====================        *हॅलो चांदा न्यूज,                       मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,*      *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                        *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here