Home
Home चंद्रपूर एक पृथ्वी, एक स्वास्थ्य ही संकल्पना मानवी एकात्मता आणि सामूहिक आरोग्यजागृतीचे प्रतीक – आ. किशोर...

एक पृथ्वी, एक स्वास्थ्य ही संकल्पना मानवी एकात्मता आणि सामूहिक आरोग्यजागृतीचे प्रतीक – आ. किशोर जोरगेवार.

0
71

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग नृत्य परिवारच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन.

                           चंद्रपूर

                     हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र ) :- संपूर्ण जगात एकाच वेळी योग साधना केली जाते आणि त्यात चंद्रपूरसारखा आपला जिल्हा सुद्धा सहभागी होतोहे आपल्या सर्वांसाठी गौरवाची बाब आहे. एक पृथ्वीएक स्वास्थ्य या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम केवळ शरीरसंपन्नतेसाठी नाहीतर मानवी एकात्मता आणि सामूहिक आरोग्यजागृती याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

योग नृत्य परिवार ट्रस्टचंद्रपूर मुख्यालयात ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एक पृथ्वीएक स्वास्थ्य, वसुधैव कुटुंबकम् आणि फिटनेस स्वतःसाठी या संकल्पनांवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळेभारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारयोग नृत्य परिवारचे संस्थापक अध्यक्ष गोपाल मुंढडाभारतीय जनता पक्षाचे प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य तुषार सोम, योग नृत्य परिवारचे जिल्हाध्यक्ष सुरेश घोडकेजिल्हा महिला प्रभारी किशोरी विरुडकरप्रमोद बावीसकरहरिदास नागपूरेविजय घोनमोडेसरिता बावीसकरआकाश घोडमारेदिलीप पूण्यपवारजितू शरबरेप्रशांत कत्तूलवारजितेंद्र इजगीलवारनरसु पोलसवारआशिष झाअशोक पडगीलवार आदींची उपस्थिती होती.

यानंतर पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले कीचंद्रपूरपासून विश्वाच्या दिशेने आरोग्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात सहभागी होऊन मी सर्व सहभागींच्या भावना जाणून घेतल्या. सर्वांनी योगासने करून आरोग्य सुदृढ ठेवण्याचा संकल्प केला.योग ही आपल्या भारताची प्राचीन परंपरा आहे. ही केवळ व्यायामपद्धती नाहीतर मनशरीर आणि आत्मा यांच्यात संतुलन निर्माण करणारी एक संपूर्ण जीवनशैली आहे. आजच्या काळाततणावअस्वस्थता आणि असमाधान यात जग व्यापून टाकत आहेतेव्हा योग म्हणजे अंतःशांती आणि सुदृढ आरोग्याचा खरा मार्ग आहे.

वसुधैव कुटुंबकम् ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. आणि फिटनेस स्वतःसाठी ही संकल्पनाही अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. आपण स्वतः सुदृढ राहिलोतरच आपले कुटुंबसमाज आणि देश सुदृढ राहतील.आज आपल्या चेहऱ्यावरील आनंदएकाग्रता आणि आरोग्याबाबतचा जागरूक दृष्टिकोन मला प्रेरणा देऊन गेला.

            प्रत्येक वॉर्डातील योग गटाला आपण आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले आहे. तसेच पुढील टप्प्यात योगासाठी स्वतंत्र शेड उभारण्याचा आपला संकल्प आहेअसेही आमदार जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.या कार्यक्रमाला योग साधकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here