वडसा
हॅलो चांदा न्युज
वडसा.(का प्र) :- आमदार रामदासजी मसराम यांनी तुकूम वडसा येथे भेटदेऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.
गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नाली, रस्ते, स्मशानभूमी, नवीन अंगणवाडी, समाजमंदिर दुरुस्ती अशा अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
गावातील गरजा व समस्यांबाबत ग्रामस्थांनी आमदारांकडे थेट मांडणी केली असता, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर विकासकामे मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
या वेळी उपस्थित : उमेश उईके, जावेद शेख,सुभाष उईके, मारुती जुमनाके, नऊलाजी पत्रे, प्रभाकर बावणे, सुखदेव जुमनाके, दामू जुमनाके, प्रविण कंनाके, बाळू पत्रे, रोशन मेश्राम, प्रशांत मडावी, राजेश जुमनाके, राधेश्याम कुमरे, देवानंद धानोजे, बहिणाबाई कोडपे, लक्ष्मी जुमनाके, मनीषा कांबळे, नमुना मेश्राम. तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 























*उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*