Home
Home चंद्रपूर न्यू आझाद गोल्डन योगनृत्य ग्रुप च्या वतीने जागतिक योग दिवस विविध कार्यक्रमाने...

न्यू आझाद गोल्डन योगनृत्य ग्रुप च्या वतीने जागतिक योग दिवस विविध कार्यक्रमाने साजरा!

0
94

                                 चंद्रपूर

                         हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(का.प्र.): न्यू आझाद गोल्डन योगनृत्य ग्रुप च्या वतीने जागतिक योग दिवस अती उत्साहात विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला .सकाळी परिवर्तन योगा फाऊंडेशन, आणि योगनृत्य कृषी भवन ग्रुप सोबत संयुक्त विद्यमाने आझाद गार्डन पार्किंग ग्राउंड येथे घेण्यात आला. तर सायंकाळी न्यू आझाद गोल्डन योगनृत्य ग्रुप च्या वतीने संताजी सभागृह येथे सांस्कृतिक कार्यक्रम तथा स्नेहभोजन चे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सामाजिक कार्यकर्ते रिपब्लिकन पक्ष नेते प्रवीणभाऊ खोब्रागडे तर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते दीपकबाबू जयस्वाल , सामाजिक कार्यकर्ते सलीम मामू शेख, माजी नगरसेवक अशोकजी उईके, ग्रुप चे ज्येष्ठ सदस्य सोमेश्वर उरकुंडवार, राजेश रामगुंडेवार होते.

या कार्यक्रमाची सुरूवात पाहुण्याचे हस्ते द्वीप प्रज्वलन करून करण्यात आली. स्वागत ग्रुप च्या महिला सदस्यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन केले.

पाहुण्यांनी आपल्या मनोगतात शरीर व मन निरोगी ठेवण्यासाठी योगाची गरज असून आपण करीत असलेल्या योगनृत्यामुळे अनेकांचे आरोग्य सुदृढ ठेवत आहात त्याबद्दल कौतुक करण्यात आले.

सदर कार्यक्रमात या ग्रुप चे ज्येष्ठ सदस्यांचा व योग प्रशिक्षकांचा उपस्थित पाहुण्याचा हस्ते सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

यांनतर सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुलीपासून तर जेष्ठ महिला सदस्यांनी एकल व समूह नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नृत्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना देखील भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन शीतल नगराळे यांनी,प्रास्ताविक संगीता कामडी तर आभार माधुरी सोनटक्के यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता धनंजय तावाडे, प्रकाश गुंठेवार, प्रवीण खेकारे , नरेश महाकाळकर, यशवंत निखार, चंद्रकांत बोरीकर, मंगेश बोकडे, उमेश हिवरे, रवी निवलकर, विनोद मरसकोल्हे, प्रवीण नवले, सुरेश गजघाटे इ नी अथक परिश्रम घेतले. 

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here