Home
Home चंद्रपूर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त भाजपच्या वतीने अभिवादन.

श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त भाजपच्या वतीने अभिवादन.

0
61

चंद्रपूर

हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर.(का प्र) :- भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि राष्ट्रवादी विचारसरणीचे महान नेतृत्व असलेले डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याला आणि बलिदानाला आदरांजली वाहिली.

या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारभाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर आहिर, भाजपचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूरमनोज पालसुरेश तालेवारदिनकर सोमलकरराकेश बोमनवाररोहित शेट्टीअ‍ॅड. हरीश मंचलवारगणेश रासपायलेविमल कातकरचंदा ईटनकरदुर्गा वैरागडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी सांगितले कीश्यामा प्रसाद मुखर्जी यांनी एक राष्ट्रएक विधानएक निशाण’ या तत्त्वासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांचे कार्य आणि राष्ट्रभक्तीचे बळ आजही आम्हा सर्व भाजप कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांवर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी राष्ट्रासाठी बलिदान’ या विचाराने प्रेरित होऊन एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here