Home
Home चंद्रपूर 5 व 6 जुलै रोजी कारागृहातील हज़रत मखदुम शाहबुद्दीन शाह उर्फ गैबीशाह...

5 व 6 जुलै रोजी कारागृहातील हज़रत मखदुम शाहबुद्दीन शाह उर्फ गैबीशाह वली रह. अ. चा दर्गा भाविकांना दर्शनासाठी खुला!

0
71

                            चंद्रपूर

                     हॅलो चांदा न्युज

चंद्रपूर(का.प्र.): चंद्रपूर जिल्हा कारागृहाच्या आतील परिसरात पुज्य हज़रत मखदुम शाहबुद्दीन शाह उर्फ गैबीशाह वली रह. अलैह यांचे समाधीस्थळी दरवषीप्रमाणे यावर्षी मोहर्रम सणानिमित्त 5 व 6 जुलै रोजी भाविकांना दर्शनासाठी खुला करण्यात येणार आहे.या कारागृहात पुर्व प्रथेप्रमाणे उर्स (यात्रा) आयोजित करण्यात येत असल्याने समाधीच्या दर्शनाकरीता सर्व समाजातील भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे सदर कालावधीत कारागृहाच्या आतील समाधीच्या दर्शनाकरीता प्रवेश देण्यात येणार आहे.

कारागृहाचे आत कोणत्याही भाविकाला मोबाईल फोन, कमेरा, खाद्यपदार्थ उदा. पेढे, बर्फी अथवा इतर खाद्यपदार्थ नेण्यास मनाई करण्यात आले आहे. तसे आढळल्यास प्रवेश नाकारण्यात येईल. नियमांचे अनुपालन करूनच समाधीस्थळी दर्शनाकरीता यावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन कारागृहाचे प्रभारी अधिक्षक सतिश सोनवणे यांनी कळविले आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
Gmail 📨⬆️⏬
shashithakkar2409@gmail.com
9022199356

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here