*सातत्यपूर्ण प्रयत्नांना मिळाले यश*
*परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले सकारात्मक निर्देश*
मुंबई
हॅलो चांदा न्युज
मुंबई.(वि प्र) :- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरात मंजूर करण्यात आलेल्या बस आगाराच्या कामाला गती मिळाली आहे. आज, सोमवार ७ जुलै २०२५ रोजी विधानभवन, मुंबई येथे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला. आ.सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुल शहरातील मंजूर कामाला गती देण्यासाठी विधानभवन मुंबई येथे आयोजित बैठकीस डॉ.माधव कुशेकर (उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक), दिनेश महाजन (जनरल मॅनेजर बांधकाम), नितीन मैंद ( व्यवस्थापक वाहतूक) आदिंची उपस्थिती होती.
बैठकीत मुल बस आगारासंबंधी रखडलेली कामे, जागेची अंमलबजावणी, कार्यान्वयनातील अडथळे आणि विभागीय समन्वय या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुल बस आगाराचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी सबंधित विभागाला आदेश परिवहन मंत्री. सरनाईक यांनी दिले.
मुल तालुक्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून, आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे रखडलेल्या आगार प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळणार आहे. बल्लारपूर विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी आ. मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील आहेत, हे विशेष.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*