Home
Home चंद्रपूर जुनगावमध्ये वैनगंगा नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश.

जुनगावमध्ये वैनगंगा नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याचे निर्देश.

0
70
                       चंद्रपूर
                हॅलो चांदा न्युज
चंद्रपूर. (का प्र) : – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यसाय मंत्री, आ.सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव व लगतच्या गावांमध्ये वैनगंगा नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत मदतीसाठी तातडीने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.पुरामुळे अनेकांच्या घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शासकीय मदत लवकरात लवकर पूरग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हाधिकारी आज (दि. १०) प्रत्यक्ष पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव व लगतच्या गावांमध्ये येथे भेट देऊन पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

या संकट काळात नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देणे हे आपले नैतिक कर्तव्य असल्याचे सांगत, आ. मुनगंटीवार यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना उद्या प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाशी समन्वय ठेवून मदतीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, चालू पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आ.सुधीर मुनगंटीवार स्वतः जुनगाव येथे भेट देऊन पुरग्रस्त भागाची सविस्तर पाहणी करणार असून, नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून ठोस निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                        *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here