Home
Home चंद्रपूर बँकेच्या स्थलांतरण विरोधात टेंभुर्डा वासियांचा एल्गार.! २१ जुलैला चक्काजाम आंदोलन.

बँकेच्या स्थलांतरण विरोधात टेंभुर्डा वासियांचा एल्गार.! २१ जुलैला चक्काजाम आंदोलन.

0
65

                        वरोरा

                  हॅलो चांदा न्युज

वरोरा.(वि प्र) :- १६ जुलै, चंद्रपूर नागपूर महामार्गावरील टेंभुर्डा येथे कित्येक वर्षांपासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापनाने सदर शाखा वरोरा येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय रद्द करावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी बुधवारी झालेल्या सभेत दिला.

टेंभुर्डा येथे असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या खात्यामध्ये टेमुर्दासह आटमुरडी ,भटाळा, आसाळा, खेमजई, मोवाडा, मांगली, उमरी, तुमगाव यासह एकूण चाळीस गावांचे खातेदारांची खाते आहेत. त्याचप्रमाणे विविध शासकीय योजनांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या योजना, बचत गट आणि शेतकरी योजनांचे पैसे व्यवहार करण्याकरता ही बँक सोयीची आहे. मात्र बँक व्यवस्थापनाने नुकताच ही शाखा वरोरा येथील आनंदवन चौकामध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामवासियांमध्ये असंतोष पसरला.
बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत सरपंच यांचे सह सर्व सदस्य व गावकऱ्यांनी ही बँक ही शाखा स्थलांतरित करण्याचा निर्णय रद्द न केल्यास २१ जुलैला टेंमुरडा बंद आणि चक्काजाम करण्याचा इशारा दिला. तसेच बँक स्थलांतरित करायची असल्यास खातेदारांचे खाते झिरो बॅलन्स करावे किंवा गावात बँकेचे स्थलांतरण टेंभुर्डा येथेच करावे, बँक स्थलांतरित झाल्यास येथील व्यापाऱ्यावर त्याचा परिणाम होणार असून ग्राहकांनी गावात बँक असल्यामुळेच खाते उघडल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी सरपंच सुचिता ठाकरे, उपसरपंच विमल वाटोळे, माजी सरपंच संगीता आगलावे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर दरवाडे, पोलीस पाटील नितेश वाटोळे तसेच ग्रामपंचायत सदस्य भारती चंदनबटवे, बेबी टेकाम, तुळशीराम आगलावे, संगीता तिखट, मयूर वीरूटकर, फकीरचंद कोटांगळे, संजय घरत,दुर्गा आगलावे, जयश्री बोरीकर, शोभा चंदनबटवे, सुरेंद्र देठे यांचेसह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या ….

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here