Home
Home चंद्रपूर शेतकरी संघटनेच्या आजी-माजी सरपंचांसह कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश.

शेतकरी संघटनेच्या आजी-माजी सरपंचांसह कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात पक्षप्रवेश.

0
192

सर्वांच्या सहकार्यातून गोंडपिपरी तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळेल: आमदार देवराव भोंगळे.

                     गोंडपिपरी

                  हॅलो चांदा न्यूस

गोंडपिपरी(वि.प्र.): चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी
तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून आज पोंभुर्णा येथे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबीरात आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोंडपिपरी तालुक्यातील पानोरा, चेकपारगांव व सुपगांव येथील शेतकरी संघटनेचे आजी-माजी सरपंच तसेच लाठी, सरांडी व पारडी येथील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.या नवप्रवेशितांमध्ये शेतकरी संघटनेचे पानोराचे सरपंच जनार्दन ढुमणे, चेकपारगांवच्या सरपंचा मनिषा निखाडे आणि माजी सरपंच बंडू गिरसावळे यांचा समावेश होता; तर कॉंग्रेसचे लाठी येथील कार्यकर्ते देवराव मरसकोल्हे, पारडी येथील सुरेश मडावी, संतोष पचारे, संदिप पचारे आणि सरांडी येथील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता वारलू मेश्राम, रमेश जगताप, संजय घोडाम, भिवसेन कोटनाके, आनंदराव कोटनाके, लक्ष्मन चिंचोलकर व विजय भोयर यांनी भाजपची वाट धरली आहे.

या पक्षप्रवेशामुळे गोंडपिपरी तालुक्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत आपल्या सर्वांच्या सहकार्याने गोंडपिपरी तालुका विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करेल असे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी यावेळी स्वागतपर बोलतांना केले.

या पक्षप्रवेशाला तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि.प. सदस्य अमर बोडलावार, भाजपा महिला मोर्चाच्या महामंत्री कु. अल्काताई आत्राम, नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, इंद्रपाल धुडसे, शहराध्यक्ष चेतनसिंह गौर, अर्चना भोंगळे, विजय शेरकुरवार, राकेश पुन, महामंत्री कोमल फरकाडे, भावनाथ सोमलकर, अरूणा जांभुळकर, शारदा गरपल्लीवार, सुरेखा श्रीकोंडावार, शिथिल लोणारे, वैभव बोनगिरवार, मनोज वनकर, तेजस्वीता भगत आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,*                       *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here