Home चंद्रपूर बल्लारपूर शहरातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गंभीर त्रुटी आणि चुका: रवि पुप्पलवार.
बल्लारपूर शहरातील मतदार यादीतील गोंधळ तातडीने थांबवा!’AAP’ ने केली मागणी.
बल्लारपूर
हॅलो चांदा न्यूस
बल्लारपूर(वि.प्र.):चंद्रपूर जिल्ह्यातील
बल्लारपूर शहरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मतदार यादीत सुरू असलेल्या भोंगळ कारभाराविरोधात आम आदमी पार्टी, बल्लारपूर ने तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतदारांना झालेल्या त्रासाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, ‘AAP’ने तातडीने मतदार यादी दुरुस्त करण्याची मागणी करत, प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेवर प्रश्न निर्माण केले आहे.
Aap चे शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना बल्लारपूर तहसीलदार मॅडम मार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बल्लारपूर शहरातील मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर गंभीर त्रुटी आणि चुका आहेत. एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात, काही मृत व्यक्तींची नावे यादीत कायम, तर गाव व वार्ड सोडून गेलेल्या व्यक्तींची नावे आजही मतदार यादीत तिथेच आहेत. हे केवळ प्रशासकीय दुर्लक्ष नाही, तर स्थानिक नेत्यांकडून बुथ लेव्हल ऑफिसर यांच्याशी संगनमत करून मतांसाठी जाणूनबुजून केल्या जाणाऱ्या गैरप्रकाराचा परिणाम असल्याची आम्हाला प्रबळ आशंका आहे!”असे आरोप देखील करण्यात आले आहे.
पुप्पलवार यांनी निदर्शनास आणून दिले की, नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये अनेक मतदारांना आपले नाव त्यांच्या वार्डाऐवजी दुसऱ्या वार्डाच्या यादीत सापडल्याने नाहक त्रास सहन करावा लागला. “यामुळे मतदारांना एका बुथ वरून दुसऱ्या बुथवर धावपळ करावी लागली आणि अनेकांना तर आपले मतही देता आले नाही.
‘AAP’ची प्रशासनाला स्पष्ट आणि कठोर मागणी आहे की बल्लारपूर शहरातील प्रत्येक बुथ लेव्हल ऑफिसरने त्यांच्या प्रभागातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन मतदार यादीची तातडीने आणि सखोल तपासणी करावी.
अशी मागणी देखील केली आहे.
प्रत्येक हयात मतदाराचे नाव राहत्या प्रभागातच असल्याची खात्री करावी.चुकीच्या ठिकाणी समाविष्ट केलेली नावे, मृत व्यक्तींची नावे आणि स्थलांतरित झालेल्यांची नावे तात्काळ मतदार यादीतून वगळण्यात यावी.
“बोगस मतदारांमुळे निवडणुकीच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो आणि मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास कमी होतो. जिल्हा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मतदार यादी पूर्णपणे दुरुस्त करावी, जेणेकरून मतदारांना कोणताही त्रास होणार नाही आणि निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व सुरळीत पार पडेल,” असे पुप्पलवार यांनी ठामपणे सांगितले.
या संदर्भात, बल्लारपूर नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेतील अधिकारी, शहरातील सर्व बूथ लेव्हल ऑफिसर, निवडणूक आयोग अधिकारी, तसेच सर्व पक्षांचे प्रतिनिधी मंडळ यांची तात्काळ संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी ‘AAP’ने केली आहे.
निवेदन देताना शहर अध्यक्ष रवि पुप्पलवार, प्रवक्ता आसिफ शेख, महिला उपाध्यक्ष मनीषा अकोले, ASAP सचिव हर्षद खंडागड़े व इत्यादि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*