Home चंद्रपूर युवासेनेची एससी/एसटी/ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढाऊ भूमिका महत्वाची ठरेल : दादा भुसे.
HELLO CHANDA NEWSJ
चंद्रपूर.(वि.प्र.): चंद्रपूर जिल्ह्यातील एससी, एसटी व ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, या महत्वाच्या मागणीसाठी युवासेना जिल्हाप्रमुख आलेख रट्टे यांच्या मार्गदर्शनात व युवा शिवसैनिक सुमित हस्तक यांच्या नेतृत्वात, शिवसैनिक सुरज शाहा यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे शिक्षणमंत्री तथा शिवसेनेचे जेष्ठ नेते दादा भुसे यांना निवेदन सादर करण्यात आले.
जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजना कागदोपत्री मिळत असल्या, तरी प्रत्यक्षात त्या वेळेवर आणि पूर्ण लाभ देण्यात कामी येत नसल्याचे वास्तव या निवेदनातून अधोरेखित करण्यात आले आहे, हे मात्र विशेष!
*निवेदनातील ठळक मागण्या*:*
१) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणात होणारा विलंब तात्काळ थांबवावा.२)जिल्ह्यातील आश्रमशाळा व वसतिगृहांची दयनीय अवस्था तातडीने सुधारावी.३)ग्रामीण व आदिवासी भागातील रिक्त शिक्षक पदे त्वरित भरावीत.४)मागास भागांमध्ये डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.५)एससी/एसटी/ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रे व कौशल्य विकास उपक्रम सुरू करावेत अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
युवासेनेच्या या निवेदनाद्वारे विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक हक्कांसाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली असून युवासेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, “शिक्षण हक्क आहे, उपकार नाही” आणि हा हक्क वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी युवासेना रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही!” यावेळी युवासेना विधानसभा समन्वयक मुनेश्वर बदखल, वरोरा तालुका अध्यक्ष प्रणव पारेलवार, युवा शिवसैनिक पीयुष सिंग, विपुल तिवारी, निखिल मांडवकर, अभिजित थाडुरी, राज चव्हाण, संदीप चटपकर, रवी ढवस उपस्थित होते.
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*