Home चंद्रपूर यहोवा यिरे फाऊंडेशन ने दिले आमदार देवराव भोंगळे व आमदार सुधाकर अडबाले...
HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर(का. प्र.): दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५
सकाळी १०.०० ते सायं. ६:०० गुरूवार रोजी यहोवा यिरे फाउंडेशन, चंद्रपूर या संस्थेच्या वतीने आयोजित “आदर्श शिक्षक, डॉक्टर्स, उद्योजक व सामाजिक कार्य पुरस्कार समारंभात” प्रमुख पाहुणे/विशिष्ट अतिथी म्हणून आमदार देवराव भोंगळे व आमदार सुधाकर अडबाले यांना विशेष उपस्थितीबाबत निमंत्रण देऊन विनंती करण्यात आली आहे, हे मात्र विशेष!
यहोवा हिरे फाउंडेशन, चंद्रपूरची ही संस्था मागील तीन वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. “शिका, कमवा आणि प्रगती करा” या ब्रीदवाक्यानुसार ही संस्था युवक युवतींसाठी विविध उपक्रम राबवत आहेत जसे की कौशल्यविकास प्रशिक्षण, मार्गदर्शन सत्रे, आरोग्य तपासणी शिबिरे, शालेय साहित्य वाटप, पर्यावरण जनजागृती मोहिमा इत्यादी सह अनेक कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून घेण्यात आले आहे.
महात्मा गांधी जयंती व या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त, दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी नागपूर येथे “आदर्श पुरस्कार २०२५” उद्योग मुवी चे प्रोमोशन या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदान करणाऱ्या शिक्षक, डॉक्टर, उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून
मा. रामदास आठवले केंद्रीय राज्यमंत्री, सामाजिक न्याय व अधिकारिता विभाग, भारत सरकार, मा. दादासाहेब भुसे शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य,
मा. सौ.एलिना उत्तेजा प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री, मुंबई, मा. कु. सिमरन अहुजा – टी.व्ही. अँकर व अभिनेत्री, मुंबई प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे
तसेच, इतर अनेक शासकीय व निमशासकीय अधिकारीसुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत.
आपणही या गौरव सोहळ्याला प्रमुख पाहुणे/विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित राहावे अशी विनंती एका विशेष पत्राच्या माध्यमातून आमदार देवराव भोंगळे व आमदार सुधाकर अडबाले यांना यहोवा यिरे फाऊंडेशन चे अध्यक्ष रमेशकुमार बोरकुटे, डी. के. आरीकर व डॉ.देव कन्नाके यांनी दोन्ही मान्यवरांची प्रत्यक्ष भेट घेऊन या कार्यक्रमात प्रामुख्याने हजर राहण्याची आग्रहाची विनंती केली आहे.
आपण या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित झाल्यास या कार्यक्रमास निश्चितच विशेष गौरव प्राप्त होईल.असे देखील या प्रसंगी डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी आमदार देवराव भोंगळे व आमदार सुधाकर अडबाले यांना सांगितले, हे मात्र विशेष!
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082* *कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*
*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*