Home
Home चंद्रपूर वढा यात्रा ही श्रद्धेचा उत्सव, सुव्यवस्था राखणे आपले सामूहिक कर्तव्य – आ. किशोर जोरगेवार.

वढा यात्रा ही श्रद्धेचा उत्सव, सुव्यवस्था राखणे आपले सामूहिक कर्तव्य – आ. किशोर जोरगेवार.

0
166

वढा यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक.

HELLO CHANDA NEWS

        चंद्रपूर.(का.प्र.) : दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने ५ नोव्हेंबर रोजी विदर्भातील पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वढा येथे भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन आढावा बैठक घेऊन यात्रेच्या नियोजनासंदर्भात महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

         यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नितीन व्यवहारेतहसीलदार विजय पवारग्रामपंचायतीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना सांळुखेमहावितरणचे उपकार्यकारी अभियंता अनिल पेंदोरअतिरिक्त कार्यकारी अभियंता मनिष कुमारघुग्घूस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निलेश रांजनकरलॉंयल मेंटल कंपनीचे क्षेत्रीय महाप्रबंधक तरुण केशवानीराज्य परिवहन मंडळाचे एटीएस गोमासेएटीआय नागापूरेविस्तार अधिकारी मीनाश्री बन्सोडेग्रामपंचायत अधिकारी रंजना मुडेबांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता सुनील राठोडधारीवालचे दिनेश गेलेवारसतीश काकडेयांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते नामदेव डाहुलेप्रकाश देवतळेवढा सरपंच किशोर वराडकरमाजी सरपंच सुनील निखाडेमहेंद्र वडसकरछोटा नागपूर उपसरपंच ऋषभ दुपारेराकेश पिंपळकर आदींची उपस्थिती होती.

              बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कीवढा ही भाविकांची आस्था असलेली पवित्र भूमी आहे. कार्तिक पौर्णिमेला येथे लाखो भाविक येतात. त्यामुळे प्रशासनातील प्रत्येक विभागाने एकत्रितपणे काम करून यात्रा सुयोग्य व शांततेत पार पडेलअसा प्रयत्न करावा.

      ते पुढे म्हणाले यात्रेकरूंच्या सोयीसाठी दहा छोट्या बसेसची व्यवस्था करण्यात यावी. मुख्य मार्गासह वढा येथे जाणाऱ्या सर्व पर्यायी मार्गांची डागडुजी करून त्यांना योग्य बनविण्यात यावे. वाहतूक व्यवस्थेसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त लावावा आणि सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा उभारण्यात यावी. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेतमदत केंद्र सुरू करावेभक्तांसाठी मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावीतसेच पावसाची शक्यता लक्षात घेता पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी.

         त्यांनी पुढे सांगितले कीनदी घाट परिसरात बॅरिकेटिंग करण्यात यावेस्वच्छतेसाठी विशेष पथके ठेवावीतआरोग्य शिबिर लावावेपार्किंगसाठी स्वतंत्र जागा राखीव ठेवावीमहिलांसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे स्वतंत्र स्नानगृह तयार करण्यात यावे. प्रत्येक एस.टी. आगारातून यात्रेसाठी विशेष बसेस सोडण्यात याव्यात. विद्युत पुरवठा अखंड ठेवण्यासंबंधीमोबाईल टॉयलेट्स उभारण्याबाबततसेच सुरक्षेच्या दृष्टीने आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या.

                 शेवटी आमदार जोरगेवार म्हणालेयात्रा ही श्रद्धेचा उत्सव आहे. श्रद्धेसोबत सुव्यवस्था राखणे हे आपले सामूहिक कर्तव्य आहे. प्रत्येक अधिकारी आणि स्वयंसेवकाने जबाबदारीने आपले कार्य पार पाडल्यास वढा यात्रा यंदाही आदर्श ठरेल असे ते म्हणाले. बैठकीला मंदिर कमेटीचे विश्वस्त, यांच्या सह संबधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. 

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here