Home
Home Breaking News महान क्रांतिकारक वीर बाबूराव शेडमाके जयंतीनिमित्त. आ. किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात...

महान क्रांतिकारक वीर बाबूराव शेडमाके जयंतीनिमित्त. आ. किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रम.

0
100

HELLO CHANDA NEWS

               चंद्रपूर,(का. प्र.) : महान क्रांतिकारक वीर बाबूराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर शहर महानगरच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

                   यावेळी भारतीय जनता पक्षाचे महामंत्री रवी गुरुनुले, सविता दंढारे, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, नगर सेविका सरला कुळसंगे, शितल गुरुनुले, सायली येरणे, विमल कातकर, भागेश्री हांडे, अल्का मेश्राम, कल्पना शिंदे, बबलु मेश्राम, विनोद पेंदलीवार, वर्षा बोकडे, शालु कंनोजवार आदींची उपस्थिती होती.

              यावेळी उपस्थित मान्यवरांनी वीर बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. स्वातंर्त्यलढ्यातील त्यांचे शौर्य, देशभक्ती आणि त्याग यांचे स्मरण करत त्यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

                वीर बाबूराव शेडमाके हे आदिवासी समाजातील एक महान क्रांतिकारक होते. त्यांनी इंग्रजांविरुद्ध शौर्याने लढा देत स्वातंर्त्याच्या चळवळीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या बलिदानामुळे देशातील स्वातंर्त्यलढ्याला नवी प्रेरणा मिळाली. त्यांच्या कार्यातून आजच्या तरुणांनी देशभक्ती, शौर्य आणि समाजसेवेची प्रेरणा घ्यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

     या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here