Home
Home चंद्रपूर जिल्ह्यातील १२५ समग्र शिक्षा कर्मचारी आजघडीला कार्यमुक्त. सेवेत कायम करण्याकरीता मुंबई येथे...

जिल्ह्यातील १२५ समग्र शिक्षा कर्मचारी आजघडीला कार्यमुक्त. सेवेत कायम करण्याकरीता मुंबई येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा 28 वा दिवस तरीही शासनाचे दुर्लक्ष.

0
153

HELLO CHANDA NEWS

    चंद्रपूर,(वि. प्र.) : सेवेत कायम करा, या मागणीसाठी समग्र शिक्षा कर्मचारी आंदोलन करीत असतानाच केंद्र शासनाने ही योजना गुंडाळली आहे.

अशात कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आले नसल्याने जिल्ह्यातील १२५ कर्मचारी आजघडीला कार्यमुक्त आहेत.

  मात्र, समग्र शिक्षा कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून, मुंबई येथे सुरू असलेल्या मोर्चात सहभागी होणार आहेत.

   समग्र शिक्षा योजनांतर्गत जिल्ह्यात विविध पदांवर १२५ कर्मचारी मागील २५ हून अधिक वर्षापासून सेवा देत आहेत.

    एवढी वर्षे काम केल्यानंतर आता तरी सेवेत कायम करा, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे. अशातच सुमारे तीन हजार कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यात आले आहे. मात्र, आजघडीला राज्यातील तीन हजार ३७८ कर्मचारी कंत्राटी तत्त्वावरच कार्यरत आहेत.

  यामुळे सेवेत कायम करण्यात यावे, या मागणीसाठी त्यांनी 9 मार्चपासून मुंबई येथे आंदोलन सुरू केले असून, त्यात जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी झाले होते. संपाचा 28 वा दिवस आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

  ३१ मार्च रोजी आर्थिक वर्ष संपल्याने ती कामे या कर्मचाऱ्यांनी आटोपून दिली, तरीही त्यांना पुनर्नियुक्ती आदेश देण्यात आले नाही. परिणामी आता १२५ कर्मचारी कार्यमुक्त झाले आहेत.

     आता त्यांनी कंबर कसली असून, हे कर्मचारी
मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार आहेत यंदा आरपारची लढाई लढण्याची त्यांनी तयारी करून घेतली आहे. मात्र, शासनाच्या निर्णयाने हे कर्मचारी एका झटक्यात बेरोजगार झाले आहेत.

शैक्षणिक उपक्रम होणार ठप्प

 समग्र शिक्षा योजनेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.

     हे उपक्रम राबवणारे कर्मचारी आत्ता कार्यमुक्त झाल्याने त्यांच्या परिणाम शैक्षणिक उपक्रमावर होणार असून ते हक्क पडणार आहेत.

           यु-डायस प्लस शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा निघून महाराष्ट्र मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वितरण संच मान्यता शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध पाठवावा अभियान या उपक्रमावर परिणाम पडणार आहे.

जिल्ह्यातील पदनीय कर्मचारी संख्या

सहाय्यक कार्यक्रम अधिकारी – 2
जिल्हा समन्वयक – 2
कार्यकारी अभियंता – 1
कनिष्ठ अभियंता – 1
संशोधन सहाय्यक – 1
वरिष्ठ लिपीक – 1
साधनव्यक्ती – 87
समावेशित तज्ञ – 2
रोखपाल नी लिपिक – 10
डाटा एन्ट्री ऑपरेटर – 12
एम आय एस को ऑर्डिनेटर – 6

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here