Home
Home चंद्रपूर राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये ‘बॉलिवूड डे’ उत्साहात साजरा.

राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमध्ये ‘बॉलिवूड डे’ उत्साहात साजरा.

0
108

HELLO CHANDA NEWS

      चंद्रपूर (का. प्र.) : सरदार पटेल मेमोरियल सोसायटीद्वारे संचालित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (SPMS) येथील संगणक विज्ञान व अभियांत्रिकी (CSE) विभागात “बॉलिवूड डे” हा वार्षिक सांस्कृतिक सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालयीन परिसरात विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

     महाविद्यालयातील CSE विभागासमोर आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

   विद्यार्थ्यांनी बॉलिवूड थीमवर आधारित वेगवेगळ्या अभिनव सादरीकरणांद्वारे आपल्या कला, अभिनय आणि नृत्यकौशल्याचे अप्रतिम दर्शन घडवले. रंगीबेरंगी वेशभूषा, आकर्षक सादरीकरणे आणि लोकप्रिय बॉलिवूड गाण्यांच्या तालावर सादर झालेल्या कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.

   कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे तसेच विभागप्रमुख डॉ. नितीन जानवे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

  त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे मत व्यक्त केले. परीक्षक म्हणून भारत नाट्य नृत्य विशारद प्रशांत कत्तूरवार व डॉ. देवश्री कोडगिरे यांनी उपस्थित राहून सादरीकरणांचे बारकाईने परीक्षण केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन सारंगी धोटे व सारंग चन्ने यांनी अत्यंत प्रभावी व रंगतदार पद्धतीने केले. त्यांच्या सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. विविध नृत्य, अभिनय, संवाद सादरीकरणे तसेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध पात्रांचे साकारलेले रूप पाहून उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

       कार्यक्रमाचे आयोजन प्रा. महेश डुंबेरे व प्रा. वृषाली आवळे यांनी केले. तसेच इतर प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही मोलाचे सहकार्य करत कार्यक्रमाच्या यशस्वीतेत हातभार लावला.

     एकूणच, “बॉलिवूड डे” हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, आत्मविश्वास व कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरला.

  विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि आकर्षक सादरीकरणांमुळे हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील असा अविस्मरणीय ठरला.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here