Home
Home चंद्रपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  देशावर मोठे ऋण – हंसराज अहीर..! महामानव  डॉ. बाबासाहेब...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  देशावर मोठे ऋण – हंसराज अहीर..! महामानव  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन!

0
121

HELLO CHANDA NEWS

    चंद्रपूर,(का. प्र.) : अलौकीक प्रज्ञेचे अथांग महासागर,भारतीय राज्यघटनेचे ‍ शिल्पकार, विश्ववंदनीय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे पुर्व अध्यक्ष हंसराज अहीर यांनी चंद्रपूर शहरातील महामानवाच्या पुतळ्यास माल्यार्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. 

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी चंद्रपूर महानगरातील डॉ. आंबेडकर चौकातील पुतळ्यास माल्यार्पण करतांना हंसराज अहीर यांनी डॉ. बाबासाहेबांचे या देशावर प्रचंड ऋण असल्याचे सांगत समाजातील दलित, वंचित,‍ शोषित, पिडीतांचे मसिहा बनुन त्यांनी केलेल्या अद्वितीय कार्यामुळेच आज स्वाभिमानाने जगणे सुसह्य झाले असल्याचे सांगितले.

       विषमतेने भरलेल्या समाजात समता, न्याय व बंधुत्वाचा स्फुलिंग चेतवण्यासाठी जीवन समर्पित करणाऱ्या या राज्यघटनेच्या शिल्पकारांच्या धगधगत्या विचारांचा वारसा समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी झटणे हीच या महामानवास खरी आदरांजली ठरेल असेही हंसराज अहीर यांनी याप्रसंगी बोलतांना सांगितले. हंसराज अहीर यांनी समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित जयंती महोत्सवात सहभाग घेवून बाबासाहेबांच्या समाज व राष्ट्रीय योगदानावर भाष्य केले.

        या अभिवादन सोहळा प्रसंगी सर्वश्री. आमदार किशोर जोरगेवार, खुशाल बोंडे, अनिल फुलझेले, रघुवीर अहीर, शेखर शेट्टी, सुभाष कासनगोट्टुवार, रवि गुरनुले, राजु घरोटे, प्रशांत चैधरी, सविता कांबळे, अॅड. सारीका संदुरकर, पुष्पा उराडे, सरला कुळसंगे, दिनकर सोमलकर, राजु येले, विकास खटी, विनोद शेरकी, श्रीकांत भोयर, शाम कनकम, प्रदीप किरमे, प्रविण चुनारकर, पुनम तिवारी, गौतम यादव, स्वप्निल डुकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here