Home
Home Breaking News चंद्रपुरात जयंतीच्या उत्साहाला गालबोट; किरकोळ वादातून तरुणाची निर्घण हत्या.

चंद्रपुरात जयंतीच्या उत्साहाला गालबोट; किरकोळ वादातून तरुणाची निर्घण हत्या.

0
190

HELLO CHANDA NEWS

​  चंद्रपूर,(वि.प्र.) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्साह सुरू असतानाच चंद्रपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गांधी चौक परिसरात डीजेच्या तालावर नाचताना झालेल्या किरकोळ धक्काबक्कीचे रूपांतर खुनी संघर्षात झाले असून, यात एका तरुणाची चाकूने वार करून निर्घण हत्या करण्यात आली आहे.

  या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नेमकी घटना काय?

​मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी रात्री ११:३० च्या सुमारास इंदिरा नगरमधील ‘भीमरत्न बहुद्देशीय युवा संस्थेची’ रॅली गांधी चौकात पोहोचली होती. यावेळी काही युवक रॅलीत शिरून नाचू लागले. यादरम्यान अनिकेत गलबले नावाच्या तरुणाला कोपर लागल्याने वादावादी सुरू झाली.

      वाद वाढत असल्याचे पाहून भीमरत्न संस्थेचा सक्रिय सदस्य रविकांत टेम्भूरकर हा मध्यस्थी करण्यासाठी गेला.

​    मात्र, चिडलेल्या आरोपींनी रविकांत आणि अनिकेतवर चाकूने सपासप वार केले.

        रविकांतच्या छातीत खोलवर वार झाल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.

या हल्ल्यात अनिकेत गलबले हा देखील गंभीर जखमी झाला आहे.

​     पोलीस स्टेशनपासून अवघ्या १०० मीटरवर हत्याकांड
​विशेष म्हणजे, ही घटना शहर पोलीस स्टेशनपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर घडली.

   जयंतीनिमित्त शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही, मिरवणुकीत काही युवक उघडपणे चाकू घेऊन फिरत होते आणि त्यांनी थेट हत्या केली, यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
​६ आरोपींना अटक
​घटनेनंतर संतप्त नागरिकांनी एका आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

          स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने तपासचक्र फिरवून उर्वरित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

          आतापर्यंत एकूण ६ आरोपींना अटक करण्यात आली असून, यामध्ये दोन सख्ख्या भावांचा आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

​           समाजाचा आधारवड हरपला
​मृत रविकांत टेम्भूरकर हा इंदिरा नगर परिसरातील रहिवासी असून तो सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असायचा. त्याच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here