Home
Home चंद्रपूर दोन चिमुकल्या बहिणी झाल्या पोरक्या बाबा आई कोन्हाला म्हणावे.

दोन चिमुकल्या बहिणी झाल्या पोरक्या बाबा आई कोन्हाला म्हणावे.

0
24

HELLO CHANDA NEWS

  चंद्रपूर,(वि.प्र.) सिंदेवाही : गुंजेवाही जंगलातील र्दुर्दैवी घटनेने चार कुटुंबांवर दुःखाचा 5 डोंगर कोसळला असला, तरी त्यामध्ये वेदांशी आणि माही या दोन चिमुकल्यांची कहाणी अनेकांचे डोळे पाणावणारी ठरली आहे.

  अवघ्या तीन वर्षापूर्वी आजारामुळे वडिलांचे निधन झाले होते आणि आता वाघाच्या हल्ल्यात आईचाही मृत्यू झाल्याने दोन्ही मुलींच्या डोक्यावरचे पालकत्वाचे छत्र कायमचे हरपले आहे.

    सुनीता कौशिक मोहुर्ले या आपल्या दोन मुलींसाठी मोठ्या जिद्दीने संसाराचा गाडा ओढत होत्या. पतीच्या निधनानंतर घराची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर आली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह

      चालवण्यासाठी त्या मजुरीसह जंगलातून तेंदूपाने गोळा करण्याचे काम करत होत्या.

मुलींचे शिक्षण आणि भविष्यासाठी त्या सातत्याने संघर्ष करत होत्या.

    मोठी मुलगी माही इयत्ता चौथीत शिक्षण घेत आहे, तर लहान वेदांशी अंगणवाडीत जाते.

     आई रोज कामासाठी बाहेर जात असली, तरी संध्याकाळी परत येऊन मुलींची काळजी घ्यायची, त्यांच्यासोबत वेळ घालवायची.

   मात्र शुक्रवारी सकाळी घरातून कामासाठी निघालेली आई पुन्हा कधीच परतली नाही. घटनेनंतर गावात शोकमय वातावरण असून नातेवाइकांच्या डोळ्यांतही अश्रू वाहत आहेत.

आता या दोन्ही चिमुकल्यांचे पुढे काय?

हा प्रश्न गावकऱ्यांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे.

    एका मागोमाग आई-वडिलांचे छत्र हरपल्याने दोन् बहिणीच्या आयुष्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

*हॅलो चांदा न्यूज, मुख्य संपादक:-शशि,ठक्कर,9881277793,9860030082*

*कार्यकारी संपादक:- शशिकांत मोकाशे,* *उपसंपादक:- विनोद शर्मा,9422168069*

*बातम्या व जाहिरात करिता संपर्क:*✍🏻
*Gmail 📨⬆️⏬*
*shashithakkar2409@gmail.com*
*9860030082*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here