HELLO CHANDA NEWS
चंद्रपूर(वि.प्र.):चंद्रपूर येथे ईद उल अज़्हा आनंदात उत्साहात साजरी झाल्याने मुस्लिम बांधवांनी मानले प्रशासनाचे आभार कारण की जिल्हा प्रशासन चे जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी ईद उल अज़्हा निमित्त बैठक बोलावून पोलिस प्रशासन मनपा प्रशासन महावितरण,पशु संवर्धन शांतता समिती सह अनेक विभागाची बैठक घेऊन आवश्यक त्या सर्व सूचना निर्देश ईद उल अज़्हा सण शांततेत उत्साहात साजरा व्हावा व कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची दखल घेण्यात यावी व आवश्यक त्या उपाय योजना करण्यात याव्या असे बैठकीत सांगितले.
जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी सुद्धा पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे व सणाच्या दरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही तसेच ईद उल अज़्हा निमित्त शासनाकडून प्राप्त निर्देशांचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश तर दिलेच परंतु कोणाकडून ही कायद्याचे उल्लंघन होऊ नये या करिता गोवंश हत्याबंदी कायद्याचे उल्लंघन ज्यांनी केले होते ज्यांच्यावर या संदर्भाचे गुन्हे दाखल झाले होते सर्वांना बोलावून प्रतिबंधक कारवाई करून या ईद उल अज़्हा (बकरी ईद) सणात शासनाकडून ज्या जनावरांच्या कत्तलीसाठी मनाई आहे ते जनावरांना कत्तल करू नये अशी सक्त ताकीद देऊन कायद्यांचे काटेकोरपणे पालन करावे असे स्पष्ट निर्देश दिल्याने यावेळी मात्र चंद्रपूर शहर परिसरात कायद्याचे पालन सर्व मुस्लिम बांधवांनी केले व ज्या जनावरांसाठी शासनाकडून कोणतीही मनाई नाही अशाच जनावरांची कुरबाणीची विधी 28,29,30 या तीन दिवसात पूर्ण केली.ही सर्व प्रक्रिया शांततेत पार पडावी या करिता जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे,उप विभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनात पोलिस स्टेशन चंद्रपूर शहरचे पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके, व रामनगर चे पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी देखील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी सर्व मस्जिद,ईदगाह चे पदाधिकारी, मौलाना,शांतता समिती ची व संबंधित विभागाची बैठक बोलावून सर्वांना शासनाचे व वरिष्ठांचे निर्देशबाबत माहिती दिली व ईद उल अज़्हा हा सण शांततेत व उत्साहात साजरा करावा व आपणास काही मदत हवी असल्यास पोलिस प्रशासन आपल्यासाठीच आहे असे विश्वास व्यक्त केल्याने मुस्लिम बांधवांनी देखील हा सण कायद्याचे पालन करून आम्ही साजरा करणार अशी ग्वाही दिली होती व मुस्लिम बांधवांनी आपला दिलेला शब्द पाळला असे आवर्जून सांगावेसे वाटते कारण मी या वेळेला 28,29,30 ईद उल अज़्हा निमित्त करण्यात आलेली कुर्बाणीची विधी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची विशेष दखल घेत अतिशय शांततेत पूर्ण केली.
चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त अकुनुरी नरेश यांच्या विशेष मार्गदर्शनात त्यांचा अधिनस्थ काम करणारे अनेक विभागाचे अधिकाऱ्यांना ईद उल अज़्हा निमित्त कोणालाही पाण्याची कमतरता होणार नाही याची दखल घेण्याचे निर्देश तर दिलेच व जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन योग्य रित्या झाले पाहिजे असे स्पष्टपणे मनपाचे संबंधित विभागाच्या अधिकारी यांना ही दिले. कुर्बाणीची विधी शांततेत पार पडली पाहिजे.
याबाबत विशेष दखल घेत तात्पुरत्या कत्तलखान्याच्या जागेची प्रत्यक्षरित्या स्वतः पाहणी केली व त्यानंतरच पठाणपुरा येथील मोहम्मदिया नगर येथील वाल कंपाऊंडच्या आत तसेच रहमतनगर येथे शाही ईदगाह समोरील वाल कंपाऊंडच्या आत तात्पुरते कत्तलखाण्याची परवानगी देण्यात यावी असे संबंधित विभागाचे उपायुक्त संदीप चिद्रावार व वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके यांना सांगितले तसेच या परिसरात चंद्रपूर शहर महानगरपालिकेकडून मंडप टाकण्यात आले आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या जेसीबी च्या सहाय्याने स्वच्छता राहावी कोणतीही रोगराई पसरणार नाही इकडे तिकडे जनावराचे वेस्ट फेकण्यात येऊ नये याची दखल घेत वेस्टेज टाकण्यासाठी खड्डा खोदून देण्यात आला व झो. क्र. 2ब, अंतर्गत येत असलेल्या जम्मणजट्टी ईदगह व मोहम्मदिया नगर मदरसा परिसरात ईद उल अज़्हा (बकरी ईद) कुरबाणी विधी पूर्ण झाल्यानंतर नंतर साफ सफाई करुन कचरा उचलण्यात आले, तसेच मोहम्मदिया नगर मदरसा मध्ये कुर्बानी चा कार्यक्रम झाल्यानंतर कुर्बानी केलेल्या जनावारांच्या वेस्ट अवयव खड्ड्यात टाकून व त्यावर ब्लीचिंग व लिंडेन पावडर टाकून जेसीबी मशीनने खड्डा बुजविण्यात आला आहे.
तसेच रहमतनगर येथील खड्डा वैद्यकीय अधिकारी डॉ.अमोल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा सफाई विभागाचे शिपाई सुधीर बक्सरिया व
सफाई कर्मचारी अभिषेक गोलटकर यांनी रहमतनगर येथील शोषित खड्ड्यात ब्लिचिंग पावडर, लिंडेन पावडर टाकले व त्यानंतर शोषित खड्डा जेसीबी च्या सहाय्याने बुजविण्यात आला.
तसेच बकरी ईद सणानिमित्त
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय चंद्रपुर जिल्हा उपआयुक्त
डॉ. सुरेश र. कुंभरे यांच्या आदेशानुसार (महमदीया नगर, पठाणपुरा),(रहमतनगर) येथील तात्पुरत्या कत्तलखान्यात कुर्बानीच्या जनावरांची आवश्यक तपासणीसाठी
पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. हरीराम वरटी, डॉ. सुचिता धांडे यांची जिल्हा संपर्क/पर्यवेक्षण अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती व डॉ.सुहास रोडे(रहमतनगर),
डॉ. विकास ताजने(रहमतनगर ), डॉ. प्रविण उईके
(महमदीया नगर, पठाणपुरा) डॉ. अश्विन चोपडे (महमदीया नगर, पठाणपुरा), यांची
सक्षम अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आली होती.या सर्वांच्या देखरेखीखाली जनावरांची तपासणी केल्यानंतरच जनावरांची कुर्बानी करण्यात आली.
पशु संवर्धन विभागाचे सर्व संबंधितांनी या ठिकाणी येऊन जनावरांची पाहणी केली, हे मात्र विशेष!
आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मांस खाण्यायोग्य आहे किंवा नाही हे जनावराच्या पाहणी नंतरच समजते त्यामुळे पशु संवर्धन विभागाच्या अधिकारी यांनी परवानगी दिल्याने मुस्लिम बांधव ही आश्वस्त झाले व त्यांच्या मनात कोणतीही शंका राहिली नाही, त्यामुळे मुस्लिम बांधवांनी देखील प्रशासनाच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या सुविधांचे कौतुक केले.
एवढेच नव्हेवतर ईद उल अज़्हा (बकरी ईद ) च्या पावन प्रसंगी लष्करी ईदगाह येथे सकाळी ८.३० वाजता मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी वसुमना पंत,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी,चंद्रपूर शहर मनपाचे आयुक्त अकुनुरी नरेश,अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उप विभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले,चंद्रपूर जिल्हा शांतता समिती सदस्य सय्यद रमजान अली,सदानंद खत्री,बाळू खोब्रागडे,गुलाब पाटील सह अनेक मान्यवरांनी मुस्लिम बांधवांची भेट घेऊन त्यांना गुलाबपुष्प भेट देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या.
तसेच मुफ्ती वलीऊल्लाह साहेब ज्यांच्या मागे ईद ची नमाज मुस्लिम बांधवांनी पूर्ण केली त्यांचे आदरपूर्वक स्वागत जिल्हाधिकारी वसुमना पंत, पोलिस अधीक्षक आयुष नोपानी, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी केल्याने मुस्लिम बांधवात देखील उत्साह संचारला व सर्वांच्या तोंडातून कौतुकास्पद उदगार या प्रसंगी निघाले.
पोलिस स्टेशन रामनगर चे पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके, पोलिस स्टेशन चंद्रपूर पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी सर्व ठिकाणी योग्य व चोख असा बंदोबस्त लावला होता तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात त्यांची टीम देखील संपूर्ण परिसरावर लक्ष केंद्रित करून होती तसेच वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याने त्यांच्या प्रयत्नांना ही यश मिळाले.
चांगले झाले असे कार्याचे कौतुक करण्याची तयारी तुम्ही आम्ही सर्वांनी वेळप्रसंगी दाखविल्यास प्रशासनातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ही नवी ऊर्जा मिळत असते ही गोष्ट आपण ही विसरली नाही पाहिजे!
चांगल्या कार्यासाठी कौतुकाची थाप संबंधितांना दिली तर त्यांचे ही मनोबल वाढते, हे मात्र विशेष!

























