Home
Home Health *शरणमं बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था व हेल्पिंग हैंड्स टिम तर्फे कैन्सर...

*शरणमं बहुउद्देशिय सामाजिक विकास संस्था व हेल्पिंग हैंड्स टिम तर्फे कैन्सर ग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत*

0
112

संतोष मारुती पाटील हा व्यक्ती चंद्रपूर येथील डॉक्टर चिद्दरवार रामनगर यांच्या दवाखान्यात काम करणारा व्यक्ती. या व्यक्तीला कोणतीही घरदार नाही ना कोणी मित्र ना कोणी नातेवाईक. तसं मूळ बघायला गेलं तर अमरावती कडला कुठलातरी. साधारणता वीस वर्षांपूर्वी आपल्या मामाच्या आसर्याने आला. इथेच राहू लागला मामाकडे डॉक्टर आखरे यांच्याकडे. पण कोरोना कालावधीत मामांचं निधन झालं आणि घराला लाक लावून मामांची मुलं पुण्याला स्थाईक झाली. सध्या डॉक्टरची चिद्दरवार यांच्या दवाखान्यातच एका लहानशा खोलीत राहायची सोय झाली आहे आणि किरावा द्यावा लागत नाही. अल्पशा पगारात उपजीविकेची तर सोय झाली परंतु जिभेच्या कर्करोगाने ग्रासले . सध्या डॉक्टरांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट जामठा येथे किमोथेरपी सुरू केली आहे परंतु आहे महागडी आणि आर्थिक जुळवाजुळव करणे महाकठीण. संतोषची हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन हेल्पिंग हॅन्ड टीम वन तर्फे कैंसरच्या उपचारासाठी पाच हजार रुपयाची मदत रामनगर येथील बानाईच्या कार्यालयात करण्यात आली. यावेळी हेल्पिंग हॅन्ड टीम वन चे चेतन ऊंदीरवाडे, यशवंत कवाडे, दिलीप होरे शेखर तावाडे अनंत आत्राम अशोक दिघीकर विलास कोहळे आणि प्रदीप अडकिने उपस्थित होते.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here