Home
Home चंद्रपूर *विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना स्पर्धा परीक्षा विद्यार्थी तसेच आम...

*विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना स्पर्धा परीक्षा विद्यार्थी तसेच आम आदमी पार्टी बल्लारपुर तर्फे निवेदन.*

0
124

=======================

* बल्लारपुर *.   

==================

मंगळवार 14 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जी यांचे बल्लारपूर शहरात आगमन झाले असता ,आम आदमी पक्षाचे युथ सचिव तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक रोहित जंगमवार यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना स्पर्धा परिक्षांच्या संदर्भातील विविध समस्यांवर आक्रमक भुमिका घेण्यासंदर्भात निवेदन दिले. तलाठी भरती , वनरक्षक भरती सारख्या प्रलंबित भरती तसेच 2019 मध्ये जाहिरात निघालेल्या जिल्हा परिषद भरती व पशुसंवर्धन भरती रद्द झाल्यावर सुद्धा त्याची परत न मिळालेली फी, अश्या अनेक प्रश्नांवर सरकारकडे जाब विचारण्या संदर्भातील विनंती केली गेली.
यावेळी CYSS सह प्रमुख आशिष गेडाम, युथ अध्यक्ष सागर कांमळे, CYSS अध्यक्ष शिरीन सिद्दीकी, देसी फिटनेस ग्रुप चे सागर पिंपरे, सुदेश शिंगाडे, स्वयम अलोने, , तसेच अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here