* अरबिंदो रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर ने अवैधरित्या काम करण्यास परवानगी घेतली.*

0
43

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

*आम आदमी पार्टी भद्रावती शहराध्यक्ष सुरज शाह
यांचा आरोप.*

===÷÷===================

दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुरज भाऊ शहा व शहर उपाध्यक्ष सुमितभाऊ हस्तक यांना गावकऱ्यांकडून सूचना मिळाली की अरविंद रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे कागदपत्राचे पुरावे अवैधरित्याने तडजोड करून काढण्यात आले या संबंधित आम आदमी पार्टीचे शहर अध्यक्ष सुरज शहा व उपाध्यक्ष सुमित हस्तक यांनी गट ग्रामपंचायत कार्यालय टाकळी येथे जाऊन चौकशी करण्यात आली तेव्हा असे आढळले की कंपनीची परवानगीच अवैधरित्या देण्यात आली आहे. गावकऱ्यांना विश्वासात न घेता अरबिंदो रियालिटी इंफ्रास्ट्रक्चर या कंपणीला खोदकामासाठी टाकळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांनी परस्पर नाहरकत प्रमाणपत्र दिल्याची बाब उघडकीस आल्यानंतर ग्रामपंचायतितर्फे ग्रामसभा बोलवून ऊपसरपंचावर अविश्वास ठराव पारीत करण्यात आला आहे. उत्खनन करण्याच्या वेळी कंपणीने विरोध करणाऱ्या गावकऱ्यांना नाहरकत प्रमाणपत्र दाखविल्यानंतर हि बाब समोर आली आहे. कंपणीकडून लाच खाऊन उपसरपंच्याने कंपणीला परस्पर नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचा आरोप गावकऱ्यांनी यावेळी केला आहे. सदर कंपणीला तालुक्यातील बेलोरा टाकळी परिसरातील आठ गावांची जमीन कोळसा ऊत्खणनासाठी देण्यात आली आहे. या जमिनीवर काम सुरु करण्याचे प्रयत्न कंपणी करीत असुन आधी जमीनीचे भाव ठरवून गावकऱ्यांच्या समस्या सोडवा व नंतरच खोदकाम सुरु करा असा पवित्रा गावकऱ्यांनी घेत कंपणीच्या कामाला विरोध दर्शविला आहे. जेव्हा पर्यंत अरबिंदू रियालिटी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सर्व कागदपत्र वैध रीतीने मंजुरी मिळत नाही व खोदकाम करण्यापुर्वी कंपणीने शेतजमीनीचा दर ठरवुन व इतर समस्या आधी मार्गी लाऊन मगच खोदकाम सुरु करावे असा इशारा आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सुरज भाऊ शाह व उपाध्यक्ष सुमित भाऊ हस्तक व संपूर्ण गावकऱ्यांनी दिला आहे.

=÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*  

======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here