===================
चंद्रपूर.चंद्रपूर येथे लहुजी शक्ती सेनेची कार्यकारणी नुकतीच गठीत करण्यात आली. लहुजी युवा शक्ती सेनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष अजय डोंगरे यांच्या हस्ते यावेळी राजेश आमटे यांची चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी प्रशांत डोंगरे, शहर अध्यक्ष बजरंग वानखेडे, जिल्हा सचिवपदी शुभम गायकवाड, सदस्यांमध्ये कन्हैय्या हिवराळे, कन्हेय्या गायकवाड यांची निवड करण्यात आली.
यावेळी समाजाचे एडव्होकेट राहुल मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सदस्यांचे यावेळी नियुक्ती पत्र देवून पुढील कार्यासाठी सदिच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी वॉर्डातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
===================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793