______________________________
आज दिनांक 18 एप्रिल रोजी आम आदमी पार्टी तर्फे घोडपेठ येथील जीर्ण झाडाचा बंदोबस्त करण्याबाबत निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे साहेब यांना दिले होते. आम आदमी पार्टी भद्रावती शहर अध्यक्ष सुरजभाऊ शहा यांचा मार्गदर्शनात व सोनल पाटील तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे व इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांचे उपस्थितीमध्ये देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत, तसेच विषयाचे गांभीर्य ओळखून वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घोडपेठ येथील चंद्रपूर – नागपूर हायवे लगत असलेल्या जीर्ण झाडाला तोडण्याची परवानगी दिली. आम आदमी पार्टीच्या निवेदनाची वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे साहेब यांनी त्वरित दखल घेतल्यामुळे आम आदमी पार्टी तसेच संपूर्ण घोडपेठ गावकरी आभार व्यक्त करीत आहे. भविष्यामध्ये जीर्ण झाडामुळे अपघात होऊ शकतो म्हणून आम आदमी पार्टी ने या गंभीर विषयाकडे लक्ष वेधले. वनविभागाने त्या जीर्ण झाडाला तोडण्याचा निर्णय देऊन या गंभीर विषयाचे समाधान केले. गावातील किंवा शहरातील असो आम आदमी पार्टी असेच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन प्रशासनाला विचारणा करत राहील असे आव्हान आम आदमी पार्टी भद्रावती तालुकाध्यक्ष सोनाल पाटील तसेच शहराध्यक्ष सुरज शहा यांनी जनतेला केले. आम आदमी पार्टीला जुळून या पद्धतीने जनतेच्या समस्या सोडवण्याच आम आदमी पार्टी तर्फे युवकांना आव्हान करण्यात आले.
___________________________
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
___________________________
संपादक :- शशी ठक्कर 9881277793