=========================
*वरोरा*
============================
वरोरा :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने स्वराज्य सप्ताह तथा स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन वरोरा येथील वणी बायपास मार्गावरील साईमंगल कार्यालयात सकाळी साडे अकरा वाजता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प माल्हार्पण व दीप प्रज्वलन करून स्वागत गीताने करण्यात आले या कार्यक्रमाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नितीन भटारकर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ,व स्वागताध्यक्ष म्हणून विलास नेरकर विधानसभा अध्यक्ष वरोरा भद्रावती तथा चंद्रपूर जिल्हा नियोजन समिती सदस्य ,प्रमुख पाहुणे म्हणून सौ रंजनाताई पारशिवे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ,राजू बोरकर तालुकाध्यक्ष भद्रावती,गितेश सातपुते, दीपक तुरारे,रवींद्र भोयर तालुकाध्यक्ष वरोरा ,चंद्रकांत कुंभारे शहराध्यक्ष वरोरा ,सौ अर्चनाताई आरेकर महिला तालुकाध्यक्ष भद्रावती,उषा आखाडे, उमा नागपुरे तसेच कार्यक्रमाला मुख्य आकर्षण म्हणून कु. दीक्षा गुरणुले शिवव्याख्याते पांढरकवडा जिल्हा यवतमाळ तसेच कुमारी रूपाली पवार,चित्रपट फेम मुंबई या उपस्थित होते. आदिशक्ती निॠती ते सावित्रीबाई फुले पर्यंत अनेक महापराक्रमी स्ञियांनी ईतिहास घडविला, शेतीचा शोध लावून मानवी जीवनाला स्थिरता प्रदान केली शिवराज्याची निर्मिती करून जिजाऊ माॅ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लोककल्याणकारी राजा म्हणून जगापुढे आदर्श निर्माण केला आजही प्रत्येक घरात जिजाऊ आहे परंतु तिला इतिहास घडविण्यासाठी संधी सातत्याने नाकारण्यात आली या स्वराज्य सप्ताह तथा स्नेहमिलन सोहळ्यातून सर्व प्रकारच्या अज्ञानाच्या शृंखला तोडून विकासाचा शाश्वत मार्ग निर्माण व्हावा या मातृसत्ताक स्वराज्य निर्माण व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी शिवरायांचा इतिहास आणि सध्याच्या परिस्थितीतील राज्यातील आव्हाने यावर मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कुंभारे शहर अध्यक्ष वरोरा तर आभार प्रदर्शन राजू बोरकर तालुकाध्यक्ष भद्रावती यांनी केले.कार्यक्रमाला गीता नवले,वंदना काळे, सोनू झाडे,मंदा घागी, ललिता आत्राम,पूनम नवले,लता किन्नके,शिला कोटनाके,कुंदा करलुके, माधुरी चामटकर,मंजुषा परशिवें,कोमल गबने, ललिता झाडे,गीता ठक, अर्चना ननावरे,खुशी श्रीरंग, दीपाली बडवाईक,श्रद्धा चतुरकर,वंदना बोरकर, प्रभा कोले,प्रमोद तीवाडे,अखिल कडूकर, मोहन जुनघरे,शेखर भोयर, मंगेश पोले, जीवन बावणे,रमेश कराळे,दिलीप खैरे,दिनेश मोहारे,अजय गायकवाड, रवींद्र ठाकरे,दिलीप महल्ले, संदीप सोमलकर,रामदास ननावरे शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===========================
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069






















