गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले, धरण क्षेत्रतील गावांना सतर्कतेचा इशारा

0
196

27 दरवाजे 1 मीटर ने तर 61.5 दरवाजे एक मीटर ने उघडले . 7797 क्यूमेक्स प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरू . पाणलोट क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा .
भंडारा जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये दमदार पाऊस सुरु आहे . गोसीखुर्द धरणाच्या पानलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत आहे.गोसीखुर्द धरणाच्या पानलोट क्षेत्रात सतत पाऊस पडत असल्याने गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडण्यात आले असून यापैकी 27 दरवाजे 1 मीटर ने तर सहा दरवाजे 1.5 मीटर ने उघडण्यात आले आहेत . या सर्व दरवाज्यातून 7797 क्युमेक्स प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे . यामुळे घरण क्षेत्रा खाली वैनगंगा नदी ओसंडून वाहत आहे .
त्यामुळे नदी काठ च्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील गावातील नागरिकांनी दक्षता बाळगावी.नदी पात्रातून जाणे येणे करताना काळजी घ्यावी तसेच जनावरांची सुद्धा काळजी घ्यावी . गावातील सरपंच यांनी गावात मुणादीच्या माध्यमातून गावकऱ्यांना दक्षता घेण्याच्या सूचना द्याव्यात असे आवाहन लाखांदूर तहसीलदार वैभव पवार , नायब तहसीलदार अखिलभारात मेश्राम यांनी आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here