आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नानंतर परदेशी शिक्षणासाठी अनिकेतला मिळाली ५० लाख रुपयांची शिष्यवृत्ती

0
67
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नानंतर चंद्रपूर येथील अनिकेत  बहादुरे या विद्यार्थ्याला परदेशी शिक्षण घेण्यासाठी ५० लक्ष रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. आता हा विद्यार्थी अमेरिकतील प्रतिष्ठित विद्यापिठात सिव्हील इंजिनिअर अभ्यासक्रम पुर्ण करु शकणार आहे.
अनिकेत  बहादुरे या चंद्रपूरातील विद्यार्थ्याने परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज दाखल केला होता. मात्र १० महिने उलटुनही शिष्यवृत्ती मिळाली नाही. परिणामी विद्यापीठाच्या सत्राची २४ ऑगस्ट हि तारीख जवळ येऊ लागल्याने त्याने आमदार किशोर जोरगेवार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यासाठी त्यांनी प्रधान सचिव व संबंधित अधिकाऱ्यांची भेटही घेतली. सदर मागणीसाठी त्यांनी पाठपुरावा सुरु ठेवला होता. अखेर अनिकेत बहादुरे याला तीन वर्षाकरिता ५० लक्ष रुपयांची शिष्यवृत्ती मंजुर झाली आहे. अंकित याला सिव्हील इंजिअर बनायच असुन शिष्यवृत्ती मंजुर झाल्यामुळे अमेरिकेतील कैलीफोर्निया येथील विद्यापीठात सदर अभ्यासक्रम पुर्ण करता येणार आहे. शिष्यवृत्ती मिळवून दिल्याबदत अनिकेत  याने आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहे. विद्यार्थाना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे प्रयत्न सुरु असतात चंद्रपुरातील विद्यार्थी उच्चशिक्षित व्हावा यासाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले आहे. आज सदर विद्यार्थाला शिष्यवृत्ती मिळवून देता आली याचे समाधान व्यक्त करत अनिकेतला आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा  दिल्या आहे.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here