राज्यपालाच्या हस्ते लहानग्या कबीर चा सत्कार

0
51

कुंगुफु ह्या क्रिडाप्रकारात अनेक स्थानिक , राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजय मिळवून चंद्रपुर शहराचा मान सन्मान देशात वाढवणाऱ्या कबीर हितेश सूचक ह्या 9 वर्षीय मुलाने नुकतीच महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा . श्री भगतसिंह जी कोशारी ह्याची राजभवनात भेट घेतली . फारच थोड्या भाग्यवान लोकांना मा . राज्यपालांना भेटण्याची संधी मिळते हीच संधी कबीर हितेश सूचक ह्याला इतक्या लहान वयात मिळाली . ह्या भेटी दरम्यान कबीर ने केलेली कामगिरी ऐकून मा . राज्यपाल खूपच प्रभावित झाले . ह्यावेळेस मा . राज्यपाल साहेबांनी कबीरला त्यानी मिळवलेल्या पुरस्कारां विषयी माहिती जाणून घेतली सोबतच त्याच्यात असलेल्या इतर कलागुणां बद्दल विचारणा केली . कबीरची निवड सप्टेंबर महिन्यात जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुंगफू स्पर्धेसाठी झालेली आहे . याविषयाची माहिती देखील त्यांनी जाणून घेतली . त्यानंतर मा . राज्यपाल साहेबांनी कबीरला ह्या स्पर्धेसाठी व भावी जीवनातल्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा देऊन त्याला अनेक आशिर्वाद दिले …

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here