एस. के. चित्रपट निर्मीती चंद्रपुर (म.रा.) ची चित्रफीत हर घर तिरंगाचे लोकार्पण !

0
46

चंद्रपुर (का.प्र.)
स्वातंत्र्याची 75 वर्षे अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या अमृत कालखंडात वंदनीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी
मोदी यांच्या नेतृत्वात चालविलेल्या ‘# हर घर तिरंगा ‘ देशव्यापी महाअभियाना अंतर्गत चंद्रपूर चे युवा चित्रपट निर्माता व उत्कृष्ट कॅमेरामॅन  देवा बुरडकर व त्यांचे सहकारी प्रितम खोब्रागडे यांनी चंद्रपुरातील ठळक स्थळांची व दैनंदिन व्यवहारांची सांगड घालून एक अप्रतिम  ‘हर घर तिरंगा ‘ चित्रफीत नुकतिच तयार करून
मा. विद्यमान कॅबीनेट मंत्री श्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते लोकार्पित केली.
या पूर्वीही या निर्मीती संस्थेने मराठी चित्रपट ‘हद्द  एक मर्यादा ‘ ची निर्मीती केली आहे तो ऑक्टोंबर मध्ये प्रदर्शित होईल. ‘हर घर तिरंगा’ ची निर्मीती केवळ राष्ट्रध्वजाचे प्रेम नसुन सोबतच आपल्या चंद्रपूर शहराची ख्याती नेटद्वारे संपूर्ण जगाला व्हावी या साठी याची निर्मीती करण्यात आली असून स्थळांची नांवे
सुद्धा टाकण्यात आली आहे ‘हर घर तिरंगा ‘ गीतावर आधारित मूळ गाण्यात  चंद्रपूर जिल्हा स्थळांची गुंफण  करून चित्रफित तयार करण्यात आली  या चित्रफीती साठी राकेश बोमनवार, प्रकाश परमार समवेत चित्रीकरणात सामील सर्वच जनांचे मनपूर्वक आभार मानले असुन
सोशल मिडीया वर या चित्रफीतीचे कौतुक होत आहे.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here