चंद्रपूर शहर स्वच्छ ठेवण्यात घंटा गाडी महिला भगिनींचे अमुल्य योगदान – आ. किशोर जोरगेवार तीन दिवस चालला रक्षा बंधन कार्यक्रम, घंटागाडी कामगारांनी बांधली आ. जोरगेवार यांना राखी

0
65

चंद्रपूरचा कामगार वर्ग हा प्रामाणिक आणि कष्टकरी आहे. घंटागाडी कामगारांच्या वतीने शहरात सुरु असलेले स्वच्छतेचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा ख-र्या स्वच्छता दुत असलेल्या या महिला भगिनींने मला राखी बांधली हे माझे भाग्य समजतो, चंद्रपूर शहराच्या विकासात घंटागाडी कामगारांचीही  महत्वाची भुमिका असुन चंद्रपूर शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यात या माझ्या भगिनींचे अमुल्य योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

  यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने रक्षा बंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घंटा गाडी महिला कामगारांनीहि आमदार किशोर जोरगेवार यांना राखी बांधली या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावर, सविता दंडारे, कौसर खान, भागश्री हांडे, आशा देशमुख, अस्मिता डोणारकर, विमल काटकर, सायली येरणे, अनिता झाडे, वैशाली मेश्राम, कल्पना शिंदे, शमा काजी, निलीमा वनकर, माधुरी निवलकर, वंदना हजारे,  रुपा परराम, आशु फुलझले,  वैशाली मद्दीवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या पदाधिका-र्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

   यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजीत रक्षा बंधन कार्यक्रम हा अतिषय भव्य झाला. एका दिवसात हा कार्यक्रम आटोपता घेणे शक्य न झाल्याने आपण सतत तिन दिवस हा कार्यक्रम चालविला. या कार्यक्रमाची ही भव्यताच माझ्यावर माझ्या भगिनींचे असलेल्या प्रेमाची खरी पावती आहे. त्यांच्या या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही, राखी चा हा धागा जबादारीचा आहे. आणि तुम्ही दिलेली जबाबदारी पुर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले.

   घंटागाडी महिला कामगारांनी राखी बांधली हा क्षण आयुष्यात कधिही न विसरणारा क्षण आहे. घंटागाडी कामगार माझ्यासाठी नेहमी आदरास्थानी राहिले आहे. कोरोना काळात त्यांनी केलेले कार्य आम्ही कधीही विसरणार नाही. खरे कोरोना योध्दा म्हणून आम्ही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने घंटागाडी कामगारांचा सत्कार केला. त्यानंतर आज पुन्हा एकदा रक्षा बंधन कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला भेटण्याचा योग आला हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

  स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा असा महान संदेश देणार्या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. त्यामुळे रक्षा बंधन हा कार्यक्रम सामाजिकरित्या साजरा केला गेला पाहिजे. असेही ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here