राज्‍य शासनाने केली गरीबांची दिवाळी आनंदी – ना. सुधीर मुनगंटीवार राज्‍य शासनाच्‍या ‘आनंदाचा शिधा’ या कार्यक्रमाचा शुभारंभ धुमधडाक्‍यात

0
43

महाराष्‍ट्रात भाजपा-सेना युतीचे सरकार आल्‍यापासून लोककल्‍याणाच्‍या योजनांचा सपाटा सुरू झाला आहे. त्‍यातीलच एक योजना आहे आनंदाचा शिधा. ज्‍यामध्‍ये स्‍वस्‍त धान्‍य दुकानातुन जे लोक धान्‍य घेतात त्‍यांना दिवाळीनिमीत्‍त एक शिधाजिन्‍नस किट देण्‍याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला. ज्‍यामध्‍ये १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणादाळ, १ लीटर पाम तेल याचा समावेश आहे. ही किट फक्‍त १०० रूपयांमध्‍ये उपलब्‍ध झाली आहे. ज्‍याचा फायदा जिल्‍हयातील ४ लाख ९ हजार २७५ शिधापत्रीका धारकांना होणार आहे. याचाच एक भाग म्‍हणून महाराष्‍ट्राचे वने, सांस्‍कृतीक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज भानापेठ वार्डातील श्री. विद्याधर श्रीरामवार यांच्‍या स्‍वस्‍त धान्‍य दुकानातुन या कार्यक्रमाचा शुभारंभ केला व पहिल्‍या दहा लाभार्थींना या किटचे वितरण केले.

याप्रसंगी बोलताना ना. मुनगंटीवार म्‍हणाले, की हे सरकार दिन, दलित, दुर्बल घटकांसाठी काम करणारे सरकार आहे. आज माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण जिल्‍हयातील सर्व घटकांना दिवाळी आनंदात साजरी करता येणार आहे. याप्रसंगी विशेष बाब म्‍हणून ना. मुनगंटीवार यांनी ३८३ शिधावाटप धारकांचे शंभर रूपये स्‍वतः भरणार असल्‍याचे सांगीतले. ज्‍यामुळे उपस्थितांमध्‍ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले व या घोषणेचे उपस्थितांनी स्‍वागत केले. याप्रसंगी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, की सरकार पुढेही सर्वसामान्‍यांसाठी लोककल्‍याणकारी योजना राबविणार आहे.

याप्रसंगी पुरवठा निरीक्षक उत्‍कर्षा पाटील, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महासचिव राजेंद्र गांधी, कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे, माजी उपमहापौर राहूल पावडे, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, मंडल अध्‍यक्ष सचिन कोतपल्‍लीवार, माजी नगरसेवक संजय कंचर्लावार, आशा आबोजवार, संगीता खांडेकर, रवि आसवानी, सुरज पेदुलवार, यश बांगडे, क्रिष्‍णा चंदावार, रामकुमार आकापेल्‍लीवार, बाळू कोलनकर, राजू जोशी, चेतन मेहता, प्रविण नरहरशेट्टीवार, शैलेश वर्मा, नितीन कारिया, प्रणिल नरहरशेट्टीवार, जितु ठाकर, मयुर चन्‍नुरवार, चांदभाई पाशा, मिथुन गोडल्‍लीवार, विक्‍की मेश्राम, सागर झोडे, कंचु कासावार, सचिन चंदुरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here