चंद्रपूरच्या विकासात बांधकाम व्यावसायीकांचा मोठा वाटा…. ‘क्रिडाई मेगा प्रॉपर्टी एक्स्पो २०२२’‎ ला आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली भेट.

0
37

चंद्रपूरचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. शहरीकरण वाढत असताना बांधकाम क्षेत्राने मात्र मोठी कामगीरी केली आहे. शहराचा सर्वांगीण विकास हा एक प्रशस्त विषय असून या विकासात बांधकाम व्यावसायिकांचा मोठा वाटा आहे. स्थापत्य अभियांत्रिकी हे क्षेत्र फार जूने असून चंद्रपूरात या क्षेत्राने मोठी भरारी घेतली आहे. चंद्रपूरच्या विकासात या क्षेत्राकडून आणखी अपेक्षा असून आज पर्यंत बांधकाम क्षेत्राने शहराच्या विकासाला दिलेले योगदान हे नोंद घेण्यासारखे असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी अध्यक्ष, संतोष कोलेट्टीवार, उपाध्यक्ष, मनोज वेगीनवार, सचिव अखिलेश खैरे, सुधीर ठाकरे, राजेंद्र कंचर्लावार, सुभाष बोमिडवार, दीपक चौधरी, आकाश भारद्वाज, सचिन तंगडपल्लीवार, नीरज पडगिलवार यांची उपस्थिती होती.

चंद्रपूर येथे बांधकाम व्यावसायिकांना काम करणे तसे अवगड आहे. ब्यु लाईन, पुरातत्व विभागाची अट, बराच भाग वेकोली अंतर्गत येत असल्याने वेकोली प्रशासनाची परवानगी अश्या अनेक अडचणी येथील बांधकाम व्यावसायिकांपुढे आहे. मधल्या काळात रेतीची बंद असल्यानेही याचा मोठा परिणाम बांधकाम क्षेत्रावर झाला होता अश्या संकटातही बांधकाम व्यावसायिक उत्तम रित्या काम करत चंद्रपुरातील राहणीमानात सुधारणा करण्याचे कार्य करत आहे.

चंद्रपूर मधील बांधकाम व्यावसायीकांच्या क्रिडाई संघटनेच्या वतीने क्रिडाई मेगा प्रॉपर्टी एक्स्पो २०२२‎ एक्स्पो प्रदर्शनाचे आयोजन शहरातील राजीव गांधी सभागृह येथे करण्यात आले आहे. क्रिडाई संघटनेच्या वतीने नागरिकांना मनपसंत आणि आपल्या‎ बजेटमध्ये घर मिळत असल्याने‎ प्रदर्शनाला‎ चंद्रपुरकरांचा नेहमी प्रतिसाद मिळाला आहे.‎ विश्वसनीयता व पारदर्शक‎ व्यवहार क्रिडाईचे वैशिष्ट्ये असल्याने क्रेडाईची लोकप्रीयता वेगानी वाढली आहे. अतिशय अल्प दरात बांधकाम व्यावसायीकांच्या क्रिडाई संघटनेच्या वतीने शहरातील नागरिकांना घरे उपलब्ध होत असल्याने चंद्रपूरच्या विकासात सुद्धा भर पडत आहे.

या‎ प्रदर्शनात नागरिकांच्या बजेटमधील घरे एकाच छताखाली घरे एकाच छताखाली‎ नागरिकांकरिता उपलब्ध असून बॅंका,‎ हाउसिंग फायनान्स संस्था तसेच बांधकाम‎ क्षेत्राशी निगडित ट्रेडर्सचे स्टॉल देखील येथे‎ आहेत. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक नव्या संधी, विशेष सवलतीचे दर, आकर्षक गृहकर्ज दर तसेच विविध पर्याय चंद्रपूर शहरातील नागरिकांना उपलब्ध होणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रदिपादन केले.

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here