*जुनोना ग्रामपंचायत गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या ताब्यात*

0
38

*जुनोना ग्रामपंचायत गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या ताब्यात*

=≠=======≠===================≠=

चंद्रपूर :- तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. भाजपचे दिग्गज नेते, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गड मानला जाणाऱ्या बल्लारशहा विधानसभा क्षेत्रातील जुनोना ग्रामपंचायतीवर गोंडवाना गणतंत्र पार्टीने एकहाती सत्ता स्थापन केली.

नऊ सदस्यीय ग्रामपंचायत असलेल्या जुनोना ग्रामपंचायतीवर गोंडवाना गणतंत्र पार्टीचे सरपंच पदासहित 5 सदस्य व 3 अपक्षांना विजय मिळवता आला. काँग्रेस ला आपला भोपळाही फोडता आला नाही आणि भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले.

गोंडवाना गणतंत्र पार्टीची मागच्या पंचवार्षिक मध्येही या ग्रामपंचायतीवर सत्ता होती नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही गोंडवाना गणतंत्र पार्टीने आपले वर्चस्व कायम राखले.

गोंडवाना गणतंत्र पार्टीचे सरपंच पदाचे उमेदवार विवेक शेंडे, सदस्य किशोर कोडापे, शेख शक्किन शेख गफ्फार, सविता मडावी, पूजा येरगुडे, सुरेखा कोसनकर हे उमेदवार विजयी झाले.

ही निवडणूक गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मनोजदादा आत्राम यांच्या मार्गदर्शनात माजी पंचायत समिती सदस्य विनोद सिडाम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाउपाध्यक्ष डॉ. संदीप शेंडे, युवा मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष गणपत नैताम, किशोर बावणे, मालताबाई कुळमेथे, भारत टेकाम, अमरदीप कुकसे यांच्या नेतृत्वात लढविण्यात आली.

विजयी उमेदवारांचे गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा नगरसेविका सतलूबाई जुमनाके, माजी जिल्हाध्यक्ष बापूराव मडावी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेबूब शेख तथा गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवानेते संकेत कुळमेथे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

======≠=============

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधाव *

==≠≠====≠≠====≠============

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here