फिस्‍कुटी, ता. मुल येथे २४ डिसेंबर रोजी भव्‍य नेत्र चिकित्‍सा शिबीर

0
45

श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेचा उपक्रम

=========================

राज्‍याचे वने, सांस्‍कृतीक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली सातत्‍याने श्री माता कन्‍यका सेवा संस्‍था आरोग्‍य शिबीरांचे आयोजन करून रूग्‍णसेवा करीत आहे. आदिवासीबहुल चंद्रपूर जिल्‍हयात नागरिकांना मोफतमध्‍ये आरोग्‍य सेवा देण्‍याचे पुण्‍यकर्म संस्‍थेद्वारे करण्‍यात येत आहे. मानव सेवा हीच ईश्‍वर सेवा मानुन सेवेचे व्रत जोपासत अमुल्‍य कार्य संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन निरंतरपणे सुरू आहे. याकरिता दिनांक २४ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वा. जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा फिस्‍कुटी (ता. मुल) येथे भव्‍य नेत्र चिकीत्‍सा शिबीराचे आयोजन करण्‍यात आले आहे.

=============================

चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये रुग्‍णसेवेचे कार्य मागील अनेक वर्षापासून श्री माता कन्‍यका सेवा संस्‍थेच्‍यावतीने करण्‍यात येत आहे. या शिबीरांचा शहरी व ग्रामीण भागातील अनेक गोर-गरीब नागरिकांनी सातत्‍याने लाभ घेतला आहे. अनेक गरिब नागरिकांना  शहरातील मोठया रुग्‍णालयातून आरोग्‍य सेवा घेणे आवाक्‍यात नसते. त्‍यामुळे ही बाब हेरुन संस्‍थेद्वारे वेळोवेळी आरोग्‍य शिबीरांचे आयोजन करण्‍यात येते. त्‍यामुळे फिस्‍कुटी येथे घेण्‍यात येत असलेल्‍या नेत्र चिकित्‍सक शिबीराला परिसरातील बहुसंख्‍य नागरिकांनी मोठया संख्‍येने उपस्थितीत राहून लाभ घ्‍यावा अशी विनंती संस्‍थेच्‍यावतीने करण्‍यात येत आहे. सदर शिबीराला कस्‍तुरबा हॉस्‍पीटल सेवाग्राम वर्धा येथील तज्ञ डॉक्‍टरांच्‍या माध्‍यमातून नेत्र तपासणी करण्‍यात येणार आहे. अशी माहीती संस्‍थेचे सचिव राजेश्‍वर सुरावार, शैलेंद्रसिंग बैस यांनी दिली. या शिबीराला येतांना राशन कार्ड व आधार कार्ड सोबत घेवून यावे अशी विनंती सुध्‍दा करण्‍यात आली आहे.

===========================

*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

===========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here