~~~~~~~~~~~~~~~~~
16/01/2023- सोमवार
========================
बल्लारपूर- शहरात काही दिवसांपासून महाराष्ट्र जल प्राधिकरणाकडून पाणी बिलाची थकबाकी वसुली करण्याची मोहिम सुरू आहे. या मोहिमेच्या संदर्भात आम आदमी पार्टी ला काहि नागरिकांकडून तक्रारी मिळत आहेत. या मोहिमेत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले. हे कर्मचारी थकबाकी वसुली मोहिमेच्या दरम्यान नागरिकांशी शिवराळ भाषेचा वापर करतात. त्यांना धमक्या देतात व अपमानित करतात अशी नागरिकांची तक्रार आहे. याप्रमाणेच अंदाधुंद वाढिव पाणी बिल आणि ठिकठिकाणी फुटलेल्या पाईपलाईन समस्येने देखील जनता त्रस्त आहे. या सर्व समस्येविरोधात आम आदमी पक्षातर्फे कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जल प्राधिकरण चंद्रपूर यांना निवेदन दिले व नागरिकांशी दुर्व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळेस जिला अध्यक्ष सुनील मुसले जी, जिला कोषाध्यक्ष सोनी जी, शहर अध्यक्ष रवि कुमार पुप्पलवार जी, शहर चुनाव प्रभारी प्रा. नागेश्वर गगंडलेवार जी, उपाध्यक्ष अफजल अली जी, कोषाध्यक्ष आसिफ़हुसेनशेख जी, सचिव ज्योतिताई बाबरे, यूथ अध्यक्ष सागर कांबळे जी, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी जी, संघठक किरण खन्ना जी इत्यादि उपस्थित होते।
=======================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
=========≠=========
संपादक :- शशी ठक्कर 9881277793