आज दिनांक- 26 जाने 2023 गुरुवार रोजी- आम आदमी पार्टी च्या वतीने दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील शहरातील बालाजी वार्ड येथील शांतीनगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अथिती म्हणून शहरातील गणमान्य डाॅक्टर्स व प्राध्यापक यांना आमंत्रित करण्यात आले. यामध्ये डाॅ. वाढई , डॉ. निषाद , डाॅ. लिहितकर , प्रा. डॉ. चौकसे सर यांचा समावेश होता. पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर परिसरातील लहान मुलांच्या नृत्याचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी संचालन कोषाध्यक्ष आसिफ शेख यांनी केले. नृत्याच्या कार्यक्रमानंतर गरजू व्यक्तींना कपडे वितरित करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, निवडणूक प्रभारी नागेश्वर गंडलेवार तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
====================
*“हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*_
___________________________
संपादक :- शशी ठक्कर 9881277793