≠======================
** अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख ,जनमंच सदस्य रवींद्र तिरानिक यांची भेट **
=============================
संत भोजाजी महाराज देवस्थान ट्रस्ट, आजनसरा येथील विश्वस्त मंडळ, धर्मदाय आयुक्त व अध्यक्षांच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभार मा.जिल्हाधिकारी यांचे कडे चौकशीची मागणी करूनही या प्रकरणाची चौकशी होत नसल्यामुळे तक्रार करते गावकरी व भाविकांवर उपोषणाची वेळ यावी ही बाब विचार करण्यास भाग पाडणारी असून, संबंधित तक्रारकर्त्यांच्या मागणीला समर्थन देण्याकरता तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याहत्येस ३०जानेवारी २०२३रोजी ७५वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून २४जानेवारी २०२३ रोजी एक दिवसीय आत्मकलेश आंदोलन भास्कर कोसुरकर जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन व ग्रामदक्षता जनआंदोलन युथ संघटन ,संदीप वरु सचिव वर्धा जिल्हा, रामराव मुडे सेलू तालुका अध्यक्ष ,राकेश कारवटकर हिंगणघाट तालुकाध्यक्ष, श्री रोडे देवळी तालुकाध्यक्ष, महेंद्र शेंडे , आदींच्या मार्गदर्शनात
तक्रार करते गावकरी व ग्रामस्थ भक्तजन यांच्या उपस्थितीत
अँड. अजित देशमुख केंद्रीय विश्वस्त अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास यांनी उपस्थिती दर्शवत आत्मकलेश आंदोलनात सहभाग दर्शवून ,सदर ग्रामस्थांना पाठिंबा दिला.
सबंध
महाराष्ट्रात पर्यटन व(विदर्भात श्रद्धेचे स्थान असणाऱ्या पुरणपोळीचा प्रसाद म्हणून नावलौकिकते साठी प्रसिद्ध असणाऱ्या श्री संत भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा येथील विश्वस्त अध्यक्ष व धर्मादाय आयुक्त यांनी देवस्थान कमिटी मध्ये चालवलेल्या अनागोंदी व भ्रष्ट कारभाराविरोधात आजनसरा येथील ग्रामस्थांचे व भक्तांचे २६ जानेवारी २०२३ प्रजासत्ताक दिनापासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून, सदर उपोषणास ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याकरता सामाजिक कार्यकर्ते अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख व जनमंच सदस्य रवींद्र तिरानिक यांनी सहकारी पदाधिकारी चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख शशिकांत मोकाशे ,गडचिरोली -ग्रामीण संपर्कप्रमुख दशरथ वाघमारे, पर्यावरण संवर्धन प्रमुख श्रीपाद बाकरे यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यासहित संत भोजाजी महाराज मंदिराच्या संलग्नित मुख्य प्रवेशद्वारावर सुरू झालेल्या येथील उपोषण स्थळास श्री शंकरराव कोसुरकर व इतर ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, अंध अपंग यांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला असून संबंधित सर्व उपोषणकर्त्यांची विदर्भातील निर्भीड सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तीराणिक यांनी भेट घेऊन समस्या जाणून घेत ,ग्रामस्थांनी चालवलेल्या लोकहितकारक आंदोलनाला पाठिंबा देत . सबब बाबीची तात्काळ वरिष्ठ स्तरावरून दखल घेण्यात येऊन सदर लोकहिताकारक प्रश्न निकाली काढण्यात यावा यासाठी ं पाठिंबा दर्शक निवेदन पत्र उपोषण स्थळी देऊन मा .जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनार्थ प्रति ग्रामस्थांना सादर करून, पाठवण्यात आले. संबंधित स्थळावरून मा.आमदार -खासदार महोदयांना या संदर्भात अवगत करण्यात आले.
—————————————
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
___________________________________
संपादक :- शशी ठक्कर 9881277793