Home
Home चंद्रपूर * सर्वोदय विद्यालय येथे अंधश्रद्धा निर्मूलन व व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम संपन्न *

* सर्वोदय विद्यालय येथे अंधश्रद्धा निर्मूलन व व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम संपन्न *

0
101

===================

सर्वोदय विद्यालय, बल्लारपूर येथे अंधश्रद्धा निर्मूलन व व्यक्तिमत्व विकास या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर ,जिल्हा सचिव धनंजय तावाडे, बल्लारपूर तालुका संघटक राजेश गावंडे यांनी व्यक्तिमत्व विकास, वैज्ञानिक दृष्टिकोन, जादूटोणाविरोधी कायदा, भूत ,भानामती, तंत्र, मंत्र ,जादूटोणा व बुवाबाजी आदी विषयांवर चमत्कार भंडा फोड प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि व्यक्तिमत्व विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय कायरकर होते तर मुख्याध्यापक गजानन पोडे, पर्यवेक्षक सुरेश पंदीलवार, तेलुकापल्लीवार यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here