==========================
;* चंद्रपूर. *
येथील आकाशवाणी परिसरातील रहिवासी तारा बाबुराव राजुरकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. निधनानंतर देहाला अग्नि न देता वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचे देहदान करण्यात येणार आहे. राजूरकर कुटूंबियांनी देहदानाचा निर्णय घेवून समाजासमाेर नवा आदर्श ठेवला आहे.
तारा राजुरकर यांचे अल्पशा आजाराने बुधवारी दुपारी ५ वाजताच्या सुमारास चंद्रपूरातील एका खाजगी रूग्णालयात निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्यांच्यापश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचे अंतिम दर्शनासाठी आकाशवाणी येथील निवासस्थानी ठेवण्यात आहे. गुरूवारी देहदानाच्या सोपस्कारानंतर वैद्यकीय महाविद्यालयाला देहादान करण्यात येणार आहे.
==================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
===================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793