* घोडपेठ ग्रामपंचायत कडून गावकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष *

0
30

==========================

दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावतीचे शहराध्यक्ष सुरज भाऊ शहा व शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक यांच्याकडून घोडपेठ गावाची पाहणी करण्यात आली, त्यावेळी दिसून आलं की जिथे सांडपाणी वाहतात अशा घान नाल्यांमधून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकलेली आहे. तेच पाणी नागरीकांना पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी देण्यात येत आहे व नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्यात येत आहे. तसेच जिल्हा परिषद शाळेच्या मागे शाळेतील क्रीडांगणात नाईलाजाने टाकाऊ कचरा फेकण्यात येत आहे, त्यामुळे शाळेच्या परिसरात होणारी घाण यावर जेव्हा नागरिकांकडून विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया अशी दिली की आम्ही वारंवार ग्रामपंचायत मध्ये जाऊन सरपंच आणि उपसरपंच यांना तक्रार दिली तरिही यावर ग्रामपंचायत काहीच उपायोजना करत नाही. घोडपेठ ग्रामपंचायत कडून वारंवार लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

========================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here