Home
Home चंद्रपूर *विदर्भ स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत नागपूर संघ विजेता*

*विदर्भ स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत नागपूर संघ विजेता*

0
107

========================

चंद्रपूर :-

===============

चंद्रपूर बास्केटबॉल ॲकॅडमी व माता महाकाली महोत्सव 2023 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विदर्भ स्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन 24 ते 25 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा स्टेडियम चंद्रपूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विदर्भातील संघाने भाग घेतला होता. सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये स्पर्धा खेळवण्यात आली बास्केटबॉल स्पर्धेमध्ये शनिवारी झालेल्या उपांत्य फेरी सामन्यात नागपूर संघाने अमरावती संघाचा दणदणीत पराभव करत विजय प्राप्त करत विदर्भ स्तरीय स्पर्धेमध्ये आपले नाव लौकिक केले. तर अमरावती संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. या स्पर्धेचे उद्घाटन चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. नागपूर विजेता संघांना प्रथम पारितोषिक राकेश तिवारी, विकास वनकर, मनीष पारखी, जयंत चुनारकर व्यंकटेशस्वामी पांगा, सी बी ए अध्यक्ष व्यंकटेश पांगा, सेक्रेटरी डॉ फारुख अहेमद, चेतन गजलवार सचिन बोबडे, प्रिन्स मनोज राहू यांच्या हस्ते रोख रक्कम व शिल्ड विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले.तसेच या स्पर्धेमध्ये महिला स्पर्धकांनी सुद्धा आपला सहभाग घेतला होता. बास्केटबॉल स्पर्धेत सिंदेवाहीचा महिला संघाने चंद्रपूर महिला संघावर मात करत प्रथम क्रमांक पटकवला. तर तिसऱ्या स्थानावर ब्रह्मपुरी महिला संघ आहे.हि स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सीबीआयचे खेळाडूंनी परीक्षण घेतला होता

===========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here