*सामाजिक कार्यकर्ते शेखर तावाडे पुरस्कृत*

0
97

====≠===================

        * चंद्रपुर *  

===============
दि.5 मार्च 2023
माहिती अधिकार,पोलिस मित्र,पत्रकार संरक्षण सेना या नामांकित संघटना यांचे संयुक्त विध्यमाने दि.5 मार्च 2023ला स्थानिक कर्मविर दादासाहेब उपाख्य मा .सा .कन्नमवार सभागृह जि.प.चंद्रपुर येथे सामाजीक,शैक्षणिक, पत्रकारीता तसेच राजकिय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे महाराष्ट्रातून विविध मान्यवरांचे सत्कार करणयात आले. आयोजित कार्यकमाचे उदघाटक मान.रविंद्र शिंदे माजी.अध्यक्ष चंद्रपुर जिल्हा सि.डि.सी.सी.बँक चंद्रपुर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा.डाॅ. अविनाश सकुंडे, सदस्य अल्पसंख्याक आयोग भारत सरकार दिल्ली. प्रमुख पाहूणे मान.श्री. किशोरभाऊ जोरगेवार आमदार चंद्रपुर , विजयकुमार खंडारे मराठी सिने अभिनेते , सौ.जयश्रीताई सावर्डेकर अध्यक्षा राष्ट्रीय महिला आयोग मुंबई मुख्यआयोजक श्री. तुळशीराम जांभुळकर मुख्य संपादक न्यूज २४ इंडिया .तथा राष्ट्रीय अध्यक्ष मानवाधिकार.मान डाॅ. कैलासदादा पठारे राष्ट्रीय अध्यक्ष पोलिस मित्र पुणे. इत्यादींचे उपस्थितीत महाराष्ट्र राज्यातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे समाजातील मान्यवरांचे सत्कार समारोह आयोजित केले.या प्रसंगी चंद्रपुर जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरबद्दल शरणमं बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री शेखर तावाडे यांना शाल ,श्रीफळ, स्मृती चिन्ह प्रदान करून मान्यवरांचे उपस्थितीत गौरविण्यात आले. याप्रसंगी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे रंगारंग कार्यक्रम संपन्न झाले.कार्यक्रमांचे यशस्वीतेसाठी माहीती अधिकार , पोलिस मित्र, व पत्रकार संघाचे विविध पदाधिकारी तसेच अमोल वर्मासह विविध कार्यकर्ते परिश्रम घेतले.संचलन प्रलय मशाखेत्री , श्रृती तपन सरकार यांनी तर किशोर मुटे यांनी आभार प्रदर्शन केले.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=======================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here