=======================
* पनवेल मुंबई -*
====================
दिनांक ५/३/२०२३ रविवार रोजी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाची राज्यस्तरीय बैठक रायगड जिल्ह्यातिल पनवेल येथील शांतीनिकेतन येथे संपुर्ण राज्यातुन आलेल्या सभासदांच्या उपस्थीतीथ पार पडली. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून चंद्रपूर, नागपुर,गडचिराेली, यवतमाळ मुंबई,ठाणे,नाशिक, मालेगाव,धुळे,शिरपूर, नांदेड,परभणी येथून आलेले पुराेगामी पत्रकार संघातील पत्रकार बांधव, भगिनी हे प्रामुख्याने उपस्थित होत्या. या राज्य स्तरिय बैठकीच्या मंचावर अध्यक्षस्थानी पुराेगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी सर हाेते. प्रमुख उपस्थित राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब अडांगळे तसेच संघाचे राष्ट्रीय सल्लागार सुभाष बिंदुवाल व माहाराष्ट्र राज्याचे राज्य अध्यक्ष संताेष जाधव सर हाेते. कार्यक्रमा प्रसंगी मार्गदर्शन करताना संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी सूर्यवंशी सर म्हणाले की आज चंद्रपूर जिल्ह्यातून २६ तासाचा प्रवास करित चंद्रपुर येथुन विदर्भातील पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित राहू शकतात याचा अर्थ आपली पुरोगामी पत्रकार संघटना आणि आपले पुरोगामी विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले असे समजायला हरकत नाही. आपला लढा हा संविधानाला वाचवण्या करिता असेल हे यावेळेस आपले अध्यक्षीय भाषनात त्यांनी आवर्जुन सांगीतले. या वेळेस सभागृहात राज्य कार्यध्यक्ष गोपाळराव लाड राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बागुल,विदर्भ अध्यक्ष नरेंद्र साेनारकर त्याच प्रमाणे राज्य बैठकीत विदर्भ उपाध्यक्ष नागपुर वरून मिलिंद नरांजे गडचिराेली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जगदिश कन्नाके यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाप्रभारी माेरेश्वर ठाकरे, चंद्रपुरातुन मनाेज माेडक, कपील भगत अमाेल राऊत हे प्रामुख्याने उपस्थित हाेते. नांदेड जिल्हा अध्यक्ष शंकर सिंह ठाकुर तसेच नाशिक जिल्हा अध्यक्ष रफिक सय्यद,शिक्षक चळवळ समितीच्या राज्याध्यक्षा शोभाताई नगराळे, अन्याय अत्याचार समितीच्या राज्याध्यक्षा कल्याणी धोंडगे, शिक्षक चळवळ समितीच्या राज्य उपाध्यक्ष प्रतिभा महिरे, शिक्षक चळवळ समितीचे राज्य कार्याध्यक्ष राजेंद्र साळवे, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष शेखर सोनवणे नाशिक जिल्हा संघटक प्रदीप देवरे ,उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब असोले,नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख सुखदेव खुर्दळ,अन्याय अत्याचार समितीच्या सुरेखा गांगुर्डे नांदेड कार्याध्यक्ष मारुती शिकारे हदगाव तालुका अध्यक्ष अवधूत खाडे, मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष प्रकाश कोल्हे,राजेंद्र वाराणसे,नीलकंठ जाधव, संतोष भोईर अल्ताफ पठाण रायगड चे जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.या वेळी राज्यभरातून पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीत मागील पाच वर्षाचा कामकाजाचा आढावा घेण्यात आला. संघाचा ताळेबंद समजाऊन सागण्यात आले. आगामी काळात संघ वाढवण्यासाठी काय करता येईल याची महत्वपुर्ण माहिती राज्य अध्यक्ष संताेष जाधव सरांनी आपले मनाेगत व्यक्त करतांना सांगीतले. बैठकीत ठरल्या प्रमाणे प्रत्येक विषयावर खास चर्चा झाली. अध्यक्षाच्या अनुमतीने वेळेवर येणारे विषय सुध्दा घेण्यात आले. या बैठकीत संघाचा हिताचे काही निर्णय सुध्दा घेण्यात आले. राज्यातुन आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना संघाचे ओळखपत्र वाटप करण्यात आले. या बैठकीचे मंच संचालन राज्याचे राज्य सचिव निलेश ठाकरे यांनी केले. राज्य अध्यक्ष संतोष जाधव,राज्य सचिव निलेश ठाकरे, विदर्भ अध्यक्ष नरेंद्र साेनारकर,ज्ञानेश्वर बागुल, रफिक सय्यद, गोपाळराव लाड मंचावर उपस्थीत मा.सुभाष बिंदूवाल ,बाळासाहेब अडांगळे तथा संस्थापक अध्यक्ष मा.विजय सुर्यवंशी सरांनी उपस्थीत पुराेगामी पत्रकार संघाच्या पत्रकारांना माैलाचे मार्गदर्शन केले. ही बैठक यशश्वी करण्या करीता राष्ट्रीय सचिव प्रविण परमार सरांनी तसेच राष्ट्रीय पदधिकारी तथा राज्यातिल पदधिकारी यांनी अथक परीश्रम घेत रायगड जिल्ह्याचा पनवेल इथुन पंधरा किलाे मिटर अंतरावर असलेले शांतीनिकेतन येथे खेळी मेळीच्या आनंदमय नैसर्गीक वातावरणात पुराेगामी पत्रकार संघाची राज्य स्तरीय बैठक शांतीपुर्वक पार पडली .
===========================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
============================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793