==================
* राहुल गांधींचा केला निषेध *
भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपुरच्या वतीने शनिवार 25 मार्च ला जटपुरा गेट येथे काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांचे विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.राहुल गांधी यांना न्यायिक प्रक्रियेतूनच शिक्षा झालेली असतांना,भाजपाचे हे कटकारस्थान. आहे,असा आरोप काँग्रेस करीत आहे.म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी. यांच्या प्रतिमेवर चप्पलने प्रहार करीत संताप व्यक्त केला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,भाजपा नेते राहुल पावडे,रवी गुरनले अंजली घोटेकर, आशिष देवतळे, रवी लोनकर, दिनकर सोमलकर, विठ्ठल डुकरे, सचिन कोतपल्लीवार, शिला चव्हाण, शितल गुरनुले, माया ऊईके, वंदना संतोषवार, प्रभा गुडढे, वर्षास सोमनकर, सय्यद चांद, विनोद शेरकी, गणेश रामगुंडेवार, धनराज कोवे, सतीश तायडे, पप्पू बोपचे,राकेश बोमनवार , विजय आगरे, भारत रोहणे, बाळू भोंगळे, विनोद खेवले, पारस पिंपळकर, प्रलय सरकार, कमलाकर येरमे, प्रदिप किरमे, रामकुमार आकापेल्लीवार, सतिश तायडे, सारिका संदूरकर, सुभाष पिंपळशेडे, धम्मप्रकाश भस्मे, प्रमोद शास्त्रकार, प्रकाश आलगमवार, तेजस अलगमवार, दिवाकर पुद्दटवार, अरूण रहांगडाले, ओम पवार, रमेश बुच्चे, मोहित डंगोरे, पराग मलोडे, राकेश बोम्मावार, सौरव मेनकुदळे, ओम पवार, मोहित डंगोरे, संदीप पोडे, राहुल सूर्यवंशी, युवा नेते सौरभ मेनकुदळे, तेजस. अलवलवार, हार्दिक खाडिलकर, विशाल सिंग यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ गुलवाडे म्हणाले,मोदी या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे, याबद्दल ते काहीच बोलत नाही याचे आश्चर्य आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ”मोदी ” या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला. न्यायालयाने या बद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते. न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. असेही ते म्हणाले.
====================
भाजपा न्यायालयात दाद मागणार
काँग्रेस नेत्यांनी न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल.
सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते , असे वक्तव्य राहुल गांधींनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते.
मोदी या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत , डॉक्टर आहेत , इंजिनीअर आहेत , व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे, असे यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले.