Home
Home चंद्रपूर * पालकमंत्र्यांच्या हस्ते पडोली चौकातील सुरक्षा उपाययोजनेसह विद्युतीकरण कामाचे भूमिपूजन “

* पालकमंत्र्यांच्या हस्ते पडोली चौकातील सुरक्षा उपाययोजनेसह विद्युतीकरण कामाचे भूमिपूजन “

0
85

—————————-


* शुद्ध पेयजल संयंत्राचेही लोकार्पण *


रोड सेफ्टी मेजर्स, सिग्नल इन्स्टॉलेशन, रोड डिव्हायडर व फुल लाईट सिग्नल आदी उपाययोजनेसह जिल्ह्यात कुठेही नाही, असे काम येथे करावे. या चौकाचे सौंदर्यीकरण करून सीसीटीव्ही सिस्टीम, सौंदर्यीकरण व आवश्यक उपाययोजना कराव्यात. यासाठी योग्य नियोजन करा. सीसीटीव्हीच्या माध्यमातून अपघातात दोष कोणाचा हे शोधणे सोयीस्कर होईल. यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले. यापूर्वी लखमापूर हनुमान मंदिरासाठी 60 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला असून पडोली येथे पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यासाठी निधी दिला जाईल, असे पालकमंत्री म्हणाले.


* शुद्ध पेयजल संयंत्राचे लोकार्पण *
—————————
आरो मशीनच्या माध्यमातून पडोली वासियांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी पडोली ग्रामपंचायतीने मागणी केली होती. या गावातील नागरिकांना आरो मशीनच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी अल्पदरात उपलब्ध होईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.


 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here