**********************
* शांततेच्या काळात रुग्णसेवा जपणे हेच रेडक्रॉस सोसायटीचे कर्तव्य – डॉ. मंगेश गुलवाडे *
***********************
चंद्रपूर: जागतिक रेडक्रॉस सोसायटीचे संस्थापक हेन्री ड्युएंट यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून जगभरात ८ मे रोजी जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने इंडियन रेडक्रॉस सोसायटी चंद्रपूरच्या वतीने बंगाली कॅम्प चौक चंद्रपूर येथे आय.एम.ए. चंद्रपूरच्या अध्यक्षा मा. डॉ. किर्ती साने तसेच सचिव मा. डॉ. कल्पना गुलवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये निशुल्क बीपी, शुगर तपासणी करण्यात आली तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.
रेडक्रॉस ही एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था असून याद्वारे गरजूंना आपातकाळी सेवा देण्याचे अनमोल कार्य करते. रुग्ण, युद्धात घायाळ, नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेले असलेल्या लोकांना जीवनदान देण्याचे तसेच घायाळांवर वैद्यकीय उपचार करून त्यांना मदत करण्याचे तसेच नैसर्गिक आणीबाणी प्रसंगी अडकलेल्या गरजूंना आपली निःस्वार्थ सेवा देत असून ही संस्था तब्बल 150 वर्षांपासून काम करीत असून रेडक्रॉस चा मुख्य उद्देश्य सैनिकांची सुश्रुषा करणे, सैनिकांना प्राथमिक उपचार व त्यांची निगा राखणे तसेच रुग्णाची, युद्धामध्ये घायाळ झालेल्या लोकांची सेवा करणे हा आहे. भारतात 1920 मध्ये पार्लियामेंट्री एक्टच्या अंतर्गत भारतीय रेडक्रॉस समितीची स्थापना करण्यात आली तेव्हापासून रेडक्रॉसचे स्वयं सेवक आपली निःस्वार्थ सेवाभाव करीत आहेत. विश्वाचे तब्बल 200 देश एकाच विचारांवर ठाम आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संस्था नैसर्गिक आपदा मध्ये अडकलेले लोकांना तसेच युद्धामध्ये घायाळ झाले असलेल्या वीरांना मदतीचा हात देऊन त्यांना यथोचित सहाय्य करतात. याच पार्श्वभूमीवर आज इंडियन रेडक्रॉस सोसायटी चंद्रपूरच्या वतीने जागतिक रेडक्रॉस दिन साजरा केला जात असल्याचे प्रतिपादन इंडियन रेडक्रॉस सोसायटी चंद्रपूरचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले आहे.
यावेळी भव्य रोगनिदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून शिबिरात महानगरातील डॉ. सत्यनारायण दुधीवार, डॉ. बालमुकुंद पालीवाल, डॉ. अभय राठोड, डॉ, अमित ढवस, अँड. विजया बांगडे, डॉ. दिलीप बिस्वास, डॉ. तोकल, तसेच प्रकल्प निर्देशक श्री. पियुष मेश्राम, श्री. विठ्ठलराव डुकरे, श्री. दिनकर सोमलकर, श्री. चंदन पाल, श्री. धनराज कोवे, श्री. प्रलय सरकार, श्री. अजय सरकार, श्री. उमेश अष्टनकर, श्री. महेश जेठे, श्री. आरिफ काझी, श्री. सुभाष मुरसकर, श्री. साजिद कुरेशी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
**********************
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
************************
संपादक :- शशी ठक्कर 9881277793