* दोन हजार नागरिकांनी घेतला बाबुपेठ येथील आरोग्य शिबिराचा लाभ *

0
20

****************************

* 100 हून अधिक रुग्ण शस्त्रक्रिये करिता सावंगी मेघे रुग्णालयात दाखल * 

****************************

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन बाबूपेठ येथील सावीत्री बाई फुले प्राथमीक शाळेत आयोजित आरोग्य शिबिराचा जवळपास दोन हजार रुग्णांनी लाभ घेतला असुन गंभिर आजार असलेल्या 100 हुन अधिक रुग्णांना शस्त्रक्रियेकरीता सावंगी मेघे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटिल, नरेंद्र जनबंधू, मनपा आरोग्य अधिकारी वनिता गर्गेलवार,  डॉ. नयना उत्तरवार, डॉ. शुभांकर पिदुरकर, अतुल चटकी, महिला शहर संघटिका, वंदना हातगावकर,  युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, विमल कातकर, सरोज चांदेकर, बबलु मेश्राम, देवा कुंटा यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पूढाकाराने चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात 10 आरोग्य शिबिर आयोजित करण्याचे नियोजित करण्यात आले आहे. यातील दोन आरोग्य शिबीर संपन्न झाले आहे तर  तिसरे आरोग्य शिबिर बाबुपेठ येथील सावित्रीबाई फुले प्राथमीक शाळेत घेण्यात आले. या शिबिरात बाबूपेठ येथील हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणी केली आहे. यावेळी सदर रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोत्पचार करण्यात आले. यावेळी  तपासणी करिता आलेल्या पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना ई – गोल्डन कार्ड व आभा कार्ड काढून देण्यात आले. तसेच सदर शिबिरामध्ये विविध आजारांबाबत जनजागृती करण्यात आली.
***************************

 * 100 हुन अधिक रुग्णांवर होणार सांवगी मेघे येथे शस्त्रक्रिया *

*****************************
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन आयोजित 10 आरोग्य शिबिरांपैकी 3 आरोग्य शिबिरे संपन्न झाली आहे. सदर तिन आरोग्य शिबिरात गंभिर आजाराने त्रस्त असलेल्या 100 हुन अधिक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी सांवगी मेघे रुग्णालयात पाठविण्यात आले असुन यातील काही रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर पूढील काही दिवसात उर्वरित रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहे.

*****************************

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

*********************************

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here